फायरवॉचरला बारमाही कामे द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:50 IST2019-06-20T00:49:52+5:302019-06-20T00:50:10+5:30
जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.

फायरवॉचरला बारमाही कामे द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात आली.
फायरवॉचरचा मेळावा आनंद भवन येथे बंडू उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मेळाव्याला प्रमुख म्हणून गजेंद्र झॉ राजनांदगाव तसेच प्रा. दहीवडे उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल मडावी म्हणाले, फायरवॉचरला आग विझविण्याव्यतिरिक्त रस्ते बनविण्याचे काम करून घेतल्या जाते. परंतु जादा कामाची जादा वेतन दिल्या जात नाही. तर प्रा. दहीवडे म्हणाले, कायम कामगार जो काम करतो तेच काम रोजंदारी कामगार करतात. त्याला कायम कामगारांची मजुरी दिली पाहीजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. संचालन व आभार सरदार चुनारकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कालीदास मंगाम, भोजराज अलाम, माणिक मडावी, गोडघाटे, अलाम यांनी प्रयत्न केले.