ट्रान्सपोर्टच्या वर्कशॉपला आग

By Admin | Updated: June 2, 2014 01:01 IST2014-06-02T01:01:46+5:302014-06-02T01:01:46+5:30

घुग्घुस चंद्रपूरवरील शेणगाव फाट्यानजीक असलेल्या सप्रा ट्रान्सपोर्टच्या वर्कशॉपला अचानक आग

The fire of the transport workshop | ट्रान्सपोर्टच्या वर्कशॉपला आग

ट्रान्सपोर्टच्या वर्कशॉपला आग

घुग्घुस : घुग्घुस चंद्रपूरवरील शेणगाव फाट्यानजीक असलेल्या सप्रा ट्रान्सपोर्टच्या वर्कशॉपला अचानक आग लागल्याने तीन हायवा ट्रक व एक ट्राली जळून खाक झाली. सदर घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली.

आग विझविण्याकरिता एसीसी, चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. लायड मेटल आणि वेकोलिचे पाणी टँकर बोलावण्यात आले. दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सप्रा ट्रान्सपोर्टच्या वर्कशापमध्ये एमएच ३४ एम ६९१0 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये गॅस वेल्डिंगचे काम सुरू होते. अचानक आग लागली आणि त्या ट्रकजवळ असलेले एमएच ३४ एबी ९४४८, एमएच ३४ एम ७७३0, हायवा ट्रक आणि एमएच ३६ एफ १७८ क्रमांकाची ट्राली जळून खाक झाली. (वार्ताहर)

Web Title: The fire of the transport workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.