घुग्घुसच्या नगरपरिषदेच्या इमारतीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:34 IST2021-09-09T04:34:21+5:302021-09-09T04:34:21+5:30
फोटो घुग्घुस : येथील नगर परिषदेच्या (ग्रा.पं.च्या) जुन्या इमारतीला बुधवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान आग लागली. त्यात ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातील ...

घुग्घुसच्या नगरपरिषदेच्या इमारतीला आग
फोटो
घुग्घुस : येथील नगर परिषदेच्या (ग्रा.पं.च्या) जुन्या इमारतीला बुधवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान आग लागली. त्यात ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातील रेकॉर्ड व गोडाऊनमधील विजेचे साहित्य जळून खाक झाले.
एसीसीच्या अग्निशमन दलाची चमू वेळीच दाखल होऊन अवघ्या काही वेळातच आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग लागल्याची बातमी कळताच, नगरपरिषदचे कर्मचारी विठोबा झाडे, सुरज जंगम, हरी जोगी, शंकर पचारे व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन गोडाऊनमधील साहित्य काढले. त्यात सॅनिटायझर भरलेले प्लास्टीक कॅन काढल्याने स्फोटासारखी अनुचित घटना टळली.
नगरपरिषदेचे प्रशासक चंद्रपूरचे तहसीलदार नीलेश गौड व मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र, झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे कठीण आहे, असे मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी सांगितले. आग ही शॉर्टसर्किटमुळे लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.