ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगीचे तांडव

By Admin | Updated: March 28, 2015 00:59 IST2015-03-28T00:59:44+5:302015-03-28T00:59:44+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्र. १५५ मध्ये गुरुवारी रात्री आग लागली. रात्रीच आग

Fire erosion in the Tadoba Andhari Tiger Reserve | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगीचे तांडव

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आगीचे तांडव

कक्ष क्रमांक १५५ मध्ये आग : मोठी हानी टळली
दुर्गापूर:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्र. १५५ मध्ये गुरुवारी रात्री आग लागली. रात्रीच आग विझविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न करण्यात आल्याने मोठी हानी टळली. मात्र अद्यापही काही भागात आग धगधगत आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आग लागू नये याकरिता विशेष उपाय योजना केल्या जातात. मात्र उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच कक्ष क्र. १५५ मध्ये आग लागली. सुखलेल्या पाला पाचोळा, खाली पडलेली फळे खाक झाले. यामुळे तृणभक्षी वन्यजीवाना याचा फटका बसणार आहे.
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून दिवसागणीक तापमाणात वाढ होत आहे. यामुळे वन्यजीवाच्या अंगाची लाही लाही होत आहे. उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याकरिता हिरव्या झाडांचा वन्यप्राणी आश्रय घेत आहे. अशातच जंगलाला आग लागल्याने वन्यजीवांची पळापळ सुरु झाली. या आगीमध्ये वन्यजीवांचा चारा जळून खाक झाला आहे.
झाडावरील पक्षांची घरटे व त्यात असलेले त्यांचे पिलांचेही नुकसान झाले आहे. झाडावरील खाली पडलेल्या बियाही नष्ट झाल्या एकंदरीत जंगलाचे मोठे नुकसान झाले आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमध्ये आग लागने एक गंभीर बाब आहे. व्याघ्र प्रशासन याकरिता एक ना अनेक उपाययोजना करते मात्र या उपाययोजना कमी पडत आहे. या वनामध्ये आजही काही भागात आग धगधगत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)

पर्यटनावर पडणार परिणाम
ताडाबो अंधारी प्रकल्पातील कक्ष क्रमांक १५५ मध्ये आग लागली. यामुळे तेथील वन्यप्राणी भटकले आहे. तृणभक्षी प्राण्यांचे खाद्यही नष्ट झाले आहे. परिणामी एकमेवांवर अवलंबून असलेली येथील साखळी तुटण्याची शक्यता आहे. ताडोबा प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून आगीच्या अशा घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा पर्यटनावरही याचा परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जंगलातील पानवठे कोरडे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र काही ठिकाणी पाणवठे नसल्याने जंगली प्राणी गावाकडे धाव घेतात, अशावेळी माणव वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष होण्याची भिती असते. त्यामुळे ताडोबासह अन्य जंगलातही पानवठे तयार केल्यास वन्यप्राण्यांना सोयीचे होईल.

Web Title: Fire erosion in the Tadoba Andhari Tiger Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.