तोहोगाव वनक्षेत्रात वणवा पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST2021-04-04T04:29:25+5:302021-04-04T04:29:25+5:30
तोहोगाव : मध्य चांदा वन प्रकल्प बल्लारपूर अंतर्गत येत असलेल्या तोहोगाव वनपरिक्षेत्रातील बहुतांश जंगल जळून खाक झाले आहे. आग ...

तोहोगाव वनक्षेत्रात वणवा पेटला
तोहोगाव : मध्य चांदा वन प्रकल्प बल्लारपूर अंतर्गत येत असलेल्या तोहोगाव वनपरिक्षेत्रातील बहुतांश जंगल जळून खाक झाले आहे. आग नियंत्रणात येत नसल्याने, जंगलातील रोपवन क्षेत्र, कटाई केलेले लांब बांबू, बांबू बंडल, कटाई केलेले लाकडे, बीट आदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती आहे.
शुक्रवारी लागलेल्या आगीत कक्ष क्रमांक ३३ मधील १००च्या जवळपास बिट तर कक्ष क्रमांक २२ मधीलही लाकडे जळल्याची माहिती आहे. यामुळे वनप्रकल्पाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार फायर वॉचरची नेमणूक केली आहे, परंतु तोहोगाव रेंजमध्ये त्या फायर वॉचरला बांबू बंडल बांधणे, जंगलात रोड तयार करणे आदी वेगळ्याच कामात गुंतविल्याने त्यांना आगीवर नियंत्रण ठेवण्यास यंत्रणा कमी पडत आहे.
कोट
तोहोगाव वन परिक्षेत्रात आगीने रौद्र रूप घेतले आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनकर्मचारी, फायर वॉचर, रात्रंदिवस काम करीत आहेत. बांबू बंडल, लांब बांबू, बिट जळाले नाही.
- विनोद दासरवार वनपरिक्षेत्र अधिकारी, तोहोगाव