पोषण आहार योजनेचे आर्थिक लाभ अनिश्चित
By Admin | Updated: May 30, 2014 23:35 IST2014-05-30T23:35:46+5:302014-05-30T23:35:46+5:30
शैक्षणिक सत्र १0१४-१५ मध्ये मुख्याध्यापकांचा भार कमी करून पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांना देण्यात येणार आहे. मात्र बचत गटाला देण्यात येणार्या आर्थिक लाभाच्या तरतुदीची माहिती देण्यात आली

पोषण आहार योजनेचे आर्थिक लाभ अनिश्चित
देवाडा (खुर्द) : शैक्षणिक सत्र १0१४-१५ मध्ये मुख्याध्यापकांचा भार कमी करून पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांना देण्यात येणार आहे. मात्र बचत गटाला देण्यात येणार्या आर्थिक लाभाच्या तरतुदीची माहिती देण्यात आली नसल्याने बचत गट सदस्य संभ्रमात आहे.
शालेय पोषण आहार बचत गटाला दिल्याने त्यांना आर्थिक लाभ कसा आणि किती देण्यात येणार याची माहिती जोपर्यंंत बचत गटांना मिळणार नाही. तोपर्यंंत बचत गट जबाबदारी स्वीकारणार नाही, असे दिसून येत आहे. शाळेकडे पोषण आहाराची जबाबदारी असताना धान्य, डाळ, तेल, जिरे, तिखट आणि मिठाची व्यवस्था शासनामार्फत केली जात होती, अशीच व्यवस्था समोरही राहणार आहे. प्राथमिक स्तर एक ते पाचकरिता भाजीपाला आणि इंधनाचा खर्च मिळून एक रुपया २१ पैसे आणि वर्ग सहा ते आठ करिता एक रुपया ५९ पैशाची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चात इंधन खर्च, हिरवा भाजीपाला आणि पुरक आहाराची व्यवस्था केली जात होती, अशीच व्यवस्था करावी लागणार आहे. मात्र गटांचा लाभांश किती याचा उल्लेख करण्यात आला नसल्याने अनेकांत तर्कवितर्क उपस्थित केले जात आहे.
शाळेकडे ही कामे आणि मुख्याध्यापकाकडे जबाबदारी असल्याने प्रती विद्यार्थी खर्ची घालण्यात येणार्या निधीची पूर्णपणे व्यवस्था केली जात होती. जर खर्चात कमी झाले तर शिक्षक स्वत:च्या खिशातून खर्च करीत होते.
आता पोषण आहार बचत गटाला देण्याचे धोरण आखल्याने व बचत गट स्वतंत्र यंत्रणा असल्याने मुलांचा खर्च कमी तर आपल्या बचत गटाचा फायदा जास्त याकडे लक्ष राहणार असल्याची प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करीत आहेत. अर्थात बचत गटाला पोषण आहार दिल्याने जेवणाची चव पाहिजे तशी मिळणार नाही अशीही शंका काही पालकांकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंंत पटसंख्येच्या आधारावर पोषण आहार शिजविणार्यांना नियुक्त करून त्यांना एक हजार प्रती महिला परिश्रमिक दिला जात होता. रोजंदारी परवडत नसताना सुद्धा भविष्यात आपल्याला याचा लाभ मिळेल या हेतूने अनेक महिलांना काम सुरु ठेवले.
अनेक वर्षे काम करूनसुद्धा आता त्यांना काम सोडून रिकामे राहण्याची वेळ येणार आहे. नवीन परिपत्रकाप्रमाणे शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटाला स्विकारायची असल्याने आणि आहार शिजविणार्यांची नियुक्ती बचत गटाने करावयाची असल्याने पूर्वीच्या पोषण आहार महिला आहार शिजविण्यासाठी राहतील किंवा नाही यावर मात्र शंकाच आहे. बचत गटांना पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी देण्यात आली असली तरी, विद्यार्थ्यांंना योग्य आणि पोषण आहार देण्यासाठी मुख्याध्यापकांना लक्ष ठेवावे लागणार आहे.
बचत गटांना देण्यात येणारा लाभांश जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी बचत गटांनी केली आहे. (वार्ताहर)