रुग्णालयातील ‘त्या’ प्रकरणाला जबाबदारांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: September 11, 2014 23:25 IST2014-09-11T23:25:40+5:302014-09-11T23:25:40+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ३ सप्टेंबरला छताला लावलेली पीओपी कोसळली. या घटनेत इंदिरा कोडापे नामक परिचारीका गंभीर जखमी झाली. महिलेला २० लाखांची आर्थिक मदत

रुग्णालयातील ‘त्या’ प्रकरणाला जबाबदारांवर गुन्हे दाखल करा
चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ३ सप्टेंबरला छताला लावलेली पीओपी कोसळली. या घटनेत इंदिरा कोडापे नामक परिचारीका गंभीर जखमी झाली. महिलेला २० लाखांची आर्थिक मदत देऊन या प्रकरणाला जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीने केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. पीओपी कोसळल्याने वार्ड क्रमांक ११ मध्ये कर्तव्यावर असलेली इंदिरा कोडापे नामक परिचारीका गंभीर जखमी झाली. तर या वार्डात उपचार घेणारे लहान मुलेही जखमी झाले आहेत. कंत्राटदाराने पीओपी लावण्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्याने ही घटना घडली. त्यामुळे काम करणाऱ्या कंत्राटरावर तसेच जिल्हा शल्यचिकीत्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीने केली आहे.
जखमींना तत्काळ आर्थिक मदत न दिल्यास रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)