वरोरा येथे हत्तीरोग जनजागृती अभियान रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:42+5:30
हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला बल्लारपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम आणि त्यांच्या चमूद्वारे सोमवारपासून करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील ४२ हजार ७९१ व बल्लारपूर शहरातील ३२ वॉर्डात ८३ हजार ७३७ अशी एकूण एक लाख २६ हजार ५२८ नागरिकांना ही औषधी देण्यात येणार आहे.

वरोरा येथे हत्तीरोग जनजागृती अभियान रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : महारोगी सेवा समिती आनंदवन वरोराव्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा व ग्रामीण रुग्णालय कोसरसार, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत संयुक्त विद्यमाने हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात करण्यात आली.
आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनात व प्रा. नरेंद्र पाटील याच्या नेतृत्वात शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विविध घोषवाक्याद्वारे हत्तीरोग समूळ उच्चटणाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रा. बबन अवघडे, प्रा. मोक्षदा नाईक, प्रा. कल्यानी आत्राम, प्रा. मनोहर चौधरी, प्रा. राठोड, सर्व कर्मचारी, रा. स. योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एक लाख २६ हजार नागरिकांना लाभ
बल्लारपूर : हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला बल्लारपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम आणि त्यांच्या चमूद्वारे सोमवारपासून करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागातील ४२ हजार ७९१ व बल्लारपूर शहरातील ३२ वॉर्डात ८३ हजार ७३७ अशी एकूण एक लाख २६ हजार ५२८ नागरिकांना ही औषधी देण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरी विभागात ७५ कर्मचारी, सात सुपरवायझर, ग्रामीण विभागात ८ उपकेंद्रातंर्गत नऊ बुथवर ३२ गावात ३५६ कर्मचारी ३८ पर्यवेक्षक व सहा डॉक्टरांची चमू प्रयत्न करीत आहे.
नवेगाव पांडव येथे औषधोपचार मोहिमेला सुरुवात
नागभीड : हत्तीरोग दुरीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, नवेगाव पांडवच्या वतीने गृहभेटीद्वारे औषधी गोळ्यांचे वितरण करण्यात आले. या मोहिमेची सुरूवात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांना गोळ्या देऊन करण्यात आली. सदर मोहीमेसाठी प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका मडावी यांच्या नेतृत्वात आरोग्य सहाय्यक डब्ल्यू. एम. बारापात्रे, ए. जे. रावेकर , आरोग्य सेवक एस. डी. खनके, आशा गटप्रवर्तक हेमा नाकाडे, आशा वर्कर शिल्पा अमृतकर यांची चमू गृहभेट करुन हत्तीरोग निर्मुलनासंदर्भात माहिती देत औषधी गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.
सिंदेवाहीत हत्तीरोग दुरीकरण मोहीम
सिंदेवाही : राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीमेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार धात्रक, सलामे यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना गोळ्या खाण्यासाठी देण्यात आल्या. याप्रसंगी सभापती मंदा बाळबुधे, संवर्ग विकास अधिकारी इल्लुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललितकुमार पटले उपस्थित होते.