पंधरा जिल्हा परिषद शाळा होणार माॅडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:16+5:302021-03-31T04:28:16+5:30
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा ...

पंधरा जिल्हा परिषद शाळा होणार माॅडेल
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील पंधरा शाळांची माॅडेल स्कुल म्हणून निवड केली आहे. या शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, निधीचेही वितरण करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक तालु्क्यातील एक तर मूल तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा निधीतून जिल्हा निधी संकेताक अन्वये माॅडेल स्कुल अंतर्गत भौतिक सुविधा पुरिण्यात येणार आहे. यामध्ये संगणक, फर्निचर, ग्रीन बोर्ड, वाॅटर फिल्टर, क्रीडा साहित्य, रंगरंगोटी आदींचा समावेश आहे. यासाठी जिल्हा परिषदेने १५ लाख रुपयांची तरतूद केली असून निवड करण्यात आलेल्या शाळांना प्रत्येकी ९३ हजार ७५० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सदर निधी याच आर्थिक वर्षात खर्च करावा लागणार आहे. या सुविधेमुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा मानस असून यातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यात येणार आहे.
बाॅक्स
या शाळांना मिळाला निधी
तालुका शाळेचे नाव
चंद्रपूर जि.प शाळा बेलसनी
भद्रावती जि.प. शाळा कवठी
वरोरा जि.प.शाळा मोखाडा
चिमूर जि.प. शाळा भिवकुंड
नागभीड जि.प.शाळा कान्पा
ब्रह्मपुरी जि.प.शाळा तोरगाव
सिदेंवाही जि.प.शाळा गडबोरी
मूल जि.प.शाळा फिस्कुटी,
जि.प.शाळा चिरोली
सावली जि.प.शाळा मुंडाळा,
गोंडपिपरी जि.प.शाळा विठ्ठलवाडा
राजुरा जि.प.शाळा देवाडा
कोरपना जि.प.शाळा भारोसा
बल्लारपूर जि.प.शाळा हडस्ती
पोंभूर्णा जि.प.शाळा बोर्डा,झुल्लूरवार
जिपती : जि.प.शाळा सेवादासनगर
बाॅक्स
या होणार सुविधा
संगणक शिक्षणासाठी संगणक खरेदी, एलसीडी, एलईडी टीव्ही, वाॅटर प्युरीफायर, फर्निचर, ग्रीन बोर्ड, क्रीडा साहित्य, शालेय परिसर सौंदर्यीकरण, प्रथमोपचार पेटी, शैक्षणिक सजावट
कोट
जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, शिक्षण घेताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये
यासाठी शाळांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने इतरही शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
-दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.चंद्रपूर