राजुरा तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:25+5:302021-04-22T04:29:25+5:30
: भारतीय मानवाधिकार असोसिएशनची मागणी सास्ती : राजुरा तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ सुरू असून, नागरिक बेजार झाले आहेत. ...

राजुरा तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ
: भारतीय मानवाधिकार असोसिएशनची मागणी
सास्ती : राजुरा तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ सुरू असून, नागरिक बेजार झाले आहेत. यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत अधिक भर पडत आहे.
राजुरा शहराच्या शेजारी असलेल्या बामणवाडा व चुनाळा या गावांचे सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे राज्य उपाध्याय बंडू मडावी व जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
राजुरा तालुक्यातील अनेक गावांत सध्या तापाची साथ सुरू आहे. काही गावांत आरोग्य तपासणी सुरू आहे. या तपासणीत अनेक नागरिक कोरोनाबाधित असल्याने त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी चुनाळा व बामणवाडा येथील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तसेच या परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सर्व लोक घाबरून आहेत.
यावर नियंत्रण मिळविण्याकरिता आरोग्य विभागाकडून चुनाळा व बामणवाडा या दोन्ही गावांत सर्वेक्षण करून तपासणी करावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार असोसिएशनचे बंडू मडावी, मनोज आत्राम, रमेश आडे, नीळकंठ साळवे आदींनी केली असून, मागणीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. आरोग्य पर्यवेक्षक मधुकर टेकाम यांनी निवेदन स्वीकारले.