आदिवासी परधान जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: September 3, 2015 00:42 IST2015-09-03T00:42:55+5:302015-09-03T00:42:55+5:30

आदिवासी परधान जमातीच्या इयत्ता १० वी व १२ वीमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राजस्थानी भवन ब्रह्मपुरी येथे पार पडला. ...

Felicitated meritorious students of Tribal Parishad tribe | आदिवासी परधान जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आदिवासी परधान जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ब्रह्मपुरी : आदिवासी परधान जमातीच्या इयत्ता १० वी व १२ वीमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राजस्थानी भवन ब्रह्मपुरी येथे पार पडला. आदिवासी परधान जमात पुरुष व महिला बचत गट ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान कन्नाके होते. प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक कुसुम अलाम, विलास कोडापे, डॉ. देव कन्नाके, एकनाथ कन्नाके, अशोक मेश्राम, भगवान आत्राम, श्यामराव गेडाम, दिलीप कोडापे, अंबादास गेडाम, वंदना मडावी, विजया गेडाम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देवीदास वेटे यांनी आदिवासी परधान जमात पुरुष व महिला बचत गटाचा गौरवास्पद उपक्रम असून जिल्ह्यात पहिल्यांदाच परधान जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा घेण्यात आला. माघारलेल्या जमातीच्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवून प्रोत्साहन देण्यासाठी व आत्मविश्वास वाढविण्यासाठी सत्कार समारंभाची अत्यंत गरज असून ठिकठिकाणी असे सत्कार सोहळे घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता १० वी व १२ वीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, डिक्शनरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर मरस्कोल्हे तर संचालन संजय कुमरे यांनी केले. आभार धनराज सुरपाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रकाश सुरपाम, युवराज मेश्राम, दामोधर मडावी, वसंता मडावी, नीळकंठ कोवे, मारेती मडावी, दिलीप मडावी, मंगेश कन्नाके, युवराज सिडाम, आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated meritorious students of Tribal Parishad tribe