एसटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी सरसावल्या निर्भया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:20+5:30

जिल्हातंर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत २२ प्रवाशांची वाहतूक सुरु असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. हे थकीत वेतन मिळावे म्हणून एसटी मधील कामगार संघटनेच्या निर्भया मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना राखी पाठवून पगाराची भेट मागणार आहेत.

Fearless for the exhausted wages of ST workers | एसटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी सरसावल्या निर्भया

एसटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी सरसावल्या निर्भया

Next
ठळक मुद्देमंत्र्यांना राखी पौर्णिमेनिमित्त एसटी महिला कामगारांचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे तोट्यात रुतलेले महामंडळाचे चाक आता आर्थिक गर्तेत रुतत चाललेले आहे. फक्त जिल्हातंर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत २२ प्रवाशांची वाहतूक सुरु असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. हे थकीत वेतन मिळावे म्हणून एसटी मधील कामगार संघटनेच्या निर्भया मुुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना राखी पाठवून पगाराची भेट मागणार आहेत.
अल्प वेतनामुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा यक्ष प्रश्न आहे. त्यात प्रशासन रोज वेगवेगळी परिपत्रके प्रसारित करून कामगारांची मानसिकता अधिक हतबल करीत आहे. यातूनच एसटीचे कर्मचारी आत्महत्या करुन आपले जीवन संपविले आहे.
देशात रक्षाबंधन सणाला मोठे महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून जीवनभर रक्षा करण्याची मागणी करत असते. तर भाऊ तितक्याच तत्परतेने बहिणीच्या रक्षणासाठी पुढे येऊन भेटसुद्धा देतो. याच सणाचे औचित्य साधून एसटी महामंडळाच्या आर्थिक कोंडीवर मार्ग काढून एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना राज्यातील एसटी कामगार संघटना समर्थित समितीच्या महिला कामगार राज्यातील प्रत्येक विभागातून मंत्र्यांना राखी व निवेदन पाठवणार आहेत.

राज्य महिला संघटक शिला नाईकवाडे यांच्या अभियानाअंतर्गत प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख मंत्री महोदयांना राखी आणि निवेदन पाठवणार आहेत. निवेदनाची दखल त्वरीत घेतली जावी, अशी विनंती महाराष्ट्रातील सर्व निर्भया आपल्या कुटुंबासहित करणार आहेत.
-स्नेहलता वासनिक
निर्भया विभाग प्रमुख,
चंद्रपूर विभाग, चिमूर आगार

Web Title: Fearless for the exhausted wages of ST workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.