‘त्या’ डबक्यामुळे आरोग्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:01:13+5:30

चंद्रपुरातील मानवता नगर परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारी खुल्या जागेवर काही वर्षांपूर्वी मोठा खड्डा होता. यामध्ये परिसरातील नागरिकांचे सांडपाणी जाते. परिणामी येथे मोठे डबके तयार झाले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाण डुकरांचा वावर असतो. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी अनेकदा मनपाकडे केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. साधी फवारणीसुद्धा करण्यात येत नाही.

Fear of health due to 'that' scare | ‘त्या’ डबक्यामुळे आरोग्याची भीती

‘त्या’ डबक्यामुळे आरोग्याची भीती

ठळक मुद्देशीलगंध बुद्धविहार मानवतानगर परिसर : मनपासह नगरसेवकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिसरातील मानवतानगर चौकातील शीलगंध बुद्ध विहाराच्यासमोर मोठे डबके तयार झाले आहे. यामध्ये मच्छरांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून नागरिकांना विविध आजारांना सामोर जावे लागत आहे. मात्र याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.
चंद्रपुरातील मानवता नगर परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारी खुल्या जागेवर काही वर्षांपूर्वी मोठा खड्डा होता. यामध्ये परिसरातील नागरिकांचे सांडपाणी जाते. परिणामी येथे मोठे डबके तयार झाले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाण डुकरांचा वावर असतो. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी अनेकदा मनपाकडे केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. साधी फवारणीसुद्धा करण्यात येत नाही.
सद्या सगळीकडे डेंग्यूसारख्या रोगांची लागण होत आहे. मात्र या परिसरात तर मच्छरांची पैदास होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे डबके बुजविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

डुकरांचा बंदोबस्त करा
या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट डुकरांचा वावर आहे. त्यामुळे ते परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाण करत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मात्र याकडे नगरसेवकसुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन डुकरांचा बंदोबस्त करावा, तसेच धोकादायक डबके बुजविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Fear of health due to 'that' scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य