बल्लारपुरातील बाजारपेठेतील गर्दीने कोरोनाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST2021-02-23T04:44:07+5:302021-02-23T04:44:07+5:30
बल्लारपूर : शहरात कोरोनामुळे अनेक ठप्प झालेले व्यवहार सुरू झाले आहे. नागरिक कोरोना विसरून बाहेर पडू लागले आहेत. परंतु ...

बल्लारपुरातील बाजारपेठेतील गर्दीने कोरोनाची भीती
बल्लारपूर : शहरात कोरोनामुळे अनेक ठप्प झालेले व्यवहार सुरू झाले आहे. नागरिक कोरोना विसरून बाहेर पडू लागले आहेत. परंतु पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे नगर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तरीसुद्धा बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. यामुळे ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देत आहे.
नगर प्रशासनाने नागरिकांना कोरोनाचे काटेकोरपणे नियम पाळण्याचे आवाहन केले असताना नागरिक कोणतीही काळजी न घेता बाहेर पडत आहे. नगरपालिका प्रशासनाने एक दिवस मोहीम राबवून नागरिकांना दंडही ठोठावला. तरीसुद्धा रविवारी आठवडी बाजारातील गर्दी नियमाचे उल्लंघन करीत होती. व्यापारी व नागरिकांकडून कोरोनाविषयी कुठल्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही.
विनामास्क फिरणाऱ्या २९ जणांवर कारवाई करून ७ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.