दोन मुलांवर गोळ्या झाडून वडिलांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:25 IST2020-04-29T05:25:46+5:302020-04-29T05:25:52+5:30

स्वत:च्या डोक्यातही बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. यामध्ये मोठा मुलगा व वडिलाचा जागीच मृत्यू झाला तर लहान मुलगा अत्यवस्थ असून मृत्यूशी झुंज देत आहे.

Father commits suicide by shooting two children | दोन मुलांवर गोळ्या झाडून वडिलांची आत्महत्या

दोन मुलांवर गोळ्या झाडून वडिलांची आत्महत्या

बल्लारपूर (चंद्रपूर) : घरगुती वादातून वडिलाने दोन मुलांवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यानंतर स्वत:च्या डोक्यातही बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. यामध्ये मोठा मुलगा व वडिलाचा जागीच मृत्यू झाला तर लहान मुलगा अत्यवस्थ असून मृत्यूशी झं्ूज देत आहे. हे हत्याकांड बल्लारपूर येथील वेकोलि परिसरातील सुभाष वॉर्डात असलेल्या जोकू नाला परिसरात मंगळवारी सायंकाळी घडले.
वडील मुलचंद शिवानंद द्विवेदी (४८) व मोठा मुलगा आकाश (२५) अशी मृतकांची नावे आहेत. धाकटा मुलगा पवन (२२) याच्या छातीत गोळी घुसली असून त्याच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलचंद द्विवेदी हे नागपूरला राहत होते. त्यांची दोनही मुले बल्लारपूरलाच वास्तव्यास होती. मुलचंद हे १५ दिवसांपूर्वी बल्लारपूरात आले व मुलांसोबतच राहात होते. अशातच मंगळवारी घरगुती कारणांवरून मुलचंदचे त्याच्या मुलांसोबत कडाक्याचे भांडण झाले.

Web Title: Father commits suicide by shooting two children