शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देअंकूर करपण्याचा धोका : धान उत्पादक तालुक्यातील रोवणी लांबणीवर जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मृग नक्षत्रातील दोन-तीन दिवस वगळल्यास जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाच नाही. मात्र, खरीप हंगाम टळेल या धास्तीने हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पेरणी केली. अंकूर उगवले परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. धान उत्पादक ९० टक्के शेतकऱ्यांनी तर अद्याप पºहेच भरले नाही. त्यामुळे यंदा रोवणी लांबणीवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.मृग नक्षत्र संपून सोमवारी आद्रा नक्षत्र सुरू झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात सुमारे ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच खरीप पिके शेती घेतात. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. सोमवार ते बुधवार या दोन दिवसात काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण यातून अंकूर तग धरतीलच याची शाश्वस्ती नाही. या आठवड्यात पाऊस आला नाही तर खरीप हंगामातील विविध पिकांचे अंकूर करपण्याची शक्यता आहे. पाऊसच नसल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांची वर्तविली आहे. आतापर्यंत पुरेसा पाऊस न पडल्याने शेतातील विहिरी कोरड्या आहेत.अनेक शेतकऱ्यांकडे कृषीपंप असले तरी पाणीच नसल्याने धानाचे पºहे जगवायचे कसे, असा प्रश्न विचारत आहेत. शिवारातील जलस्त्रोतांची पातळी चिंताजनक आहे. शेतीला लागून असलेले नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे यावर्षीचा शेतीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरविणारा असल्याचे दिसून येत आहे.सोयाबीन उगविलेच नाहीराजुरा, कोरपना, भद्रावती, वरोरा व गोंडपिपरी तालुक्यात सोयाबीन पेरणीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगविले नाही. त्यामुळे मजूर लावून हाताने टोबणी करीत आहेत. बियाणे न उगविल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाºयांकडे केल्या जात आहेत. कृषी विभागाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी वरोरा व भद्रावती येथील शेतकºयांनी केली.दुबार पेरणीचे संकटखडसंगी : परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन पेरणी केली. धानाचे पºहे टाकले. बियाण्यांना कोंब आले असताना अचानक पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. खडसंगी परिसरामध्ये कोरडवाहू शेती करणाºयांचीच संख्या अधिक आहे. पावसाने साथ दिली तरच शेती अन्यथा कष्टाची माहिती, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.लखमापूर परिसरातील पेरणी रखडलीलखमापूर : कोरपना तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतात समाधानकारक ओलावा असेल तरच पेरणी केली जात आहे. यंदा कापूस बियाण्यांची लागवड अधिक प्रमाणात झाली. सोयाबीन लागवड करणारे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर कपाशीचे मोठे नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकरी हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी