शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाठीवरील फवारणी पंपाच्या ओझ्यातून होणार शेतकऱ्यांची मुक्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

पिकांवर फवारणी करणे हे शारीरिक श्रमाचे काम आहे. त्यामुळे अशा कामासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. सामान्य मजुरांपेक्षा फवारणी करणाऱ्यांना ज्यादा पैसे द्यावे लागतात. त्यामुळे हे काम खर्चिक आहे. शिवाय उभ्या पिकात फवारणी करणे धोकादायक असल्यामुळे टाळावे लागते. यामुळे हातचे पीक वाया जाते. हा अनुभव गतवर्षी सोयाबीन पिकाबाबत आला होता. ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी करणारे सध्या यंत्र उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देसुसा येथील शेतकऱ्याची कल्पकता : कापणी यंत्रापासून बनविले फवारणी यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पिकांवर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पंपाच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेले सुसा येथील युवा शेतकरी श्रीकांत एकुडे यांनी कापणी यंत्राचे फवारणी यंत्रात रूपांतरीत करून या ओझ्यापासून सुटका केली आहे. हे यांत्रिक जुगाड अतिशय स्वस्त आणि उपयोगी असून शेतकऱ्यांचा श्रम, वेळ व पैसाही वाचणार आहे.पिकांवर फवारणी करणे हे शारीरिक श्रमाचे काम आहे. त्यामुळे अशा कामासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. सामान्य मजुरांपेक्षा फवारणी करणाऱ्यांना ज्यादा पैसे द्यावे लागतात. त्यामुळे हे काम खर्चिक आहे. शिवाय उभ्या पिकात फवारणी करणे धोकादायक असल्यामुळे टाळावे लागते. यामुळे हातचे पीक वाया जाते. हा अनुभव गतवर्षी सोयाबीन पिकाबाबत आला होता. ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी करणारे सध्या यंत्र उपलब्ध आहेत. परंतु हा खर्च लहान शेतकºयांना परवडणारा नाही. त्यामुळे या संकटातून मुक्ती मिळविण्यासाठी सुसा येथील श्रीकांत एकुडे यांनी कापणी यंत्राचे चक्क फवारणी यंत्रात रूपांतर केले. या यंत्रामुळे फवारणीचे काम अतिशय कमी खर्चात होईल, असा दावा एकुडे यांनी केला आहे. 

असा तयार झाला जुगाडफवारणी यंत्र तया करण्यासाठी ५० लिटर पाण्याची कॅन, लोखंडी पिंजरा, जुन्या पंपाची बॅटरी, मोटर व नळ्यांचा वापर केला आहे. या यंत्राद्वारे अर्धा तासात किमान एक एकरात फवारणी करता येते. यासाठी फक्त ३०० मिली पेट्रोल लागतो. यंत्राचा वापर सोयाबीन व कापूस भाजीपाला पिकांवरही करता येतो. सोयाबीन पिकात वापरण्यासाठी पट्टा पद्धतीचा वापर केला जात आहे. लहान कापणी यंत्र उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना असा यांत्रिक जुगाड सहजपणे करता येतो, अशी माहिती शेतकरी श्रीकांत एकुडे यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने घेतली प्रेरणाराज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच सोयाबीनच्या एसबीजी ९९७ या वाणाचे संशोधक सुरेश बापुराव गरमडे यांनी श्रीकांत एकुडे यांनी तयार केलेल्या फवारणी यंत्राची पाहणी केली. त्यांनीही यापासून प्रेरणा घेऊन यांत्रिक जुगाडातून अशा प्रकारचे यंत्र तयार केले. या फवारणी यंत्र तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी एकुडे यांनी दर्शविली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती