हळद उत्पादक शेतकरी पंचायत समितीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:31 IST2017-08-19T00:31:36+5:302017-08-19T00:31:54+5:30
तालुक्यातील हळद उत्पादकांना जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रम अंतर्गत प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते.

हळद उत्पादक शेतकरी पंचायत समितीवर धडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यातील हळद उत्पादकांना जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रम अंतर्गत प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. २०१५-२०१६ या वर्षात चिमूर पंचायत समितीतर्फे ८० शेतकरी लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झाले. मात्र काजळसर येथील एकाच कुटूंबातील २५ लाभार्थ्यांना दिल्याने इतर हळद उत्पादक शेतकºयांत रोष पसरला आहे. याविरोधात शेतकºयांनी उपसभापती शांताराम सेलवटकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी पंचायत समितीवर धडक देऊन बीडीओ डोंगरे यांना घेराव घातला.
जल्हा वार्षिक योजना नाविन्य पूर्ण बाब अंतर्गत सुधारीत पद्धतीने हळद लागवड करण्यासाठी २०१५- २०१६ या वर्षात ८० शेतकºयांना प्रति व्यक्ती २१ हजार ७०० रुपये मंजूर अनुदान देण्यात आले. मात्र मंजूर यादीत २५ लाभार्थी एकाच काजळसर गावातील एकाच जातीतील असल्याने घोळ झाला आहे. यातील लाभार्थी रामदीन बोरकर यांचा दोन महिन्यापूर्वी तर व नकटू बाळबुधे यांचा सात वर्षाअगोदर मृत्यू झाला. तरीही दोघांच्याही नावाने अनुदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी बीडीओंना घेराव घालून जाब विचारला.
यावेळी उपसभापती शांताराम सेलवट, लालाजी मेश्राम, देवांगना मेश्राम, कौशल्या बन्सोड, सुलोचना मेश्राम, सुमित्रा रामटेके, शंकर हटवादे, दयाराम कावळे, नितेश निकोडे, मारोती सामुसाकडे, उद्धव निकोडे, रमेश बन्सोड, रवी मेश्राम, रतीराम पाटील साधू नागपुरे आदी शेतकरी उपस्थित होते.