शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 6:00 AM

यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगाम खोळंबणार : शेतकऱ्यांना हरभरा बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रमाणित बियाने हरभरा बियाणे उपलब्ध न झाल्याने शेतकºयांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी बारा वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हरभरा बियाणे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने कृषी विभागाची तारांबळ उडाली होती.चिमूर तालुक्यात नेरी, मासळ खडसंगी, भिसी, शंकरपूर परिसर खरीप हंगामातील धान, कापूस, सोयाबीन आणि रब्बी पिकासांठी हरभरा,गहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शेतकऱ्यांचा खरिप हंगाम संपण्याच्या मार्गावर आला आहे त्यामुळे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीसाठी तयारीला लागला आहे यावर्षी जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात पडलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. शेतकरी अनुदान तत्वावर हरभरा बियाणे मिळण्याकरिता कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र हंगाम सुरू होऊनही बियाणे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले. जि. प. सदस्य बुटके यांच्या नेतृत्वामध्ये कृषी अधिकारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुनील दाभेकर, प्रमोद दांडेकर, विवेक रामटेके, वडशी, विनोद मेश्राम, प्रकाश कुमरे, दिगंबर कामडी, बालाजी कामडी, सुनील कडवे, रत्ना सोनुने, बालाजी वाकडे, बकाराम वाकडे, यशवंत सावसाकडे, विकास वाकडे, मधुकर भोयर, देवनाथ रादये मदनापूर , पांडुरंग वाकडे उपस्थित होते.रब्बी हंगाम वाया जाण्याच्या मार्गावरयंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दहा-बारा दिवसाचा कालावधी लोटल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे. पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना हरभरा बियाणे दिल्याचे समजते. पण, शेकडो शेतकरी वंचित राहिले. दुसऱ्या टप्प्यात बियाणे येणार की नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हरभरा बियाणाची वाट बघत आहेत तर काही शेतकऱ्यांना परमिट वाटप करण्यात आले. पेरणीची वेळ निघून गेल्यानंतर काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप