पारंपरिक शेतीतून बाहेर पडण्याची शेतकऱ्यांची धडपड; ३५० एकरात करडईची लागवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:48 PM2020-11-11T12:48:46+5:302020-11-11T12:49:23+5:30

Agriculture Chandrapur News यावर्षी नागभीड तालुका कृषी कार्यालयाने काही गावात काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याने कडई लागवड करण्यात आली.

Farmers struggle to get out of traditional farming | पारंपरिक शेतीतून बाहेर पडण्याची शेतकऱ्यांची धडपड; ३५० एकरात करडईची लागवड 

पारंपरिक शेतीतून बाहेर पडण्याची शेतकऱ्यांची धडपड; ३५० एकरात करडईची लागवड 

googlenewsNext

घनश्याम नवघडे
    लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :  धान उत्पादकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागभीड तालुक्यात पहिल्यांदाच ३५० एकरात करडईची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रयोगाच्या यशस्वीतेकडे शेतकऱ्यांसोबत कृषी तज्ज्ञांचेही लक्ष लागले आहे. 
तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतल्या जाते. धानाचे पीक हातात आली की ओलिताची सोय असलेले शेतकरी गहू, हरभरा, लाख, लाखोळी, जवस, उडिद, मूग तसेच बांधावर तुरीचे पीक घेत होते. कोणत्याही शेतकऱ्याने मागील २५ वर्षांत करडईचे पीक घेतल्याचे उदाहरण नाही. 
मात्र यावर्षी तालुका कृषी कार्यालयाने काही गावात काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याने कडई लागवड करण्यात आली. बीज प्रक्रिया कशी करावी, लागवड करताना दोन ओळीत अंतर किती ठेवावे आदी माहिती देण्यात आली.  करडई हा तेलवर्गीय गळीत पीक असून १२० दिवसात हातात येते. सध्या तालुक्यात प्रचलित असलेल्या इतर पिकांपेक्षा अनेक बाबतीत फायदेशीर आहे. करडईला बाजारात पाच हजार ते साडेपाच हजार प्रति क्विंटल भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी करडई लागवडलीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

शासनाकडून ५ किलो बियाणे उपलब्ध 
करडईचे तेल हृदयरोगावर गुणकारी असल्याने करडईच्या तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. करडईचे एकरी ५ किलो बियाणे शासनाने उपलब्ध करून दिले.  तालुक्यात हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढील हंगामात करडईचा पेरा वाढू शकतो. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

 करडई काटेरी असल्याने जनावरांपासून पिकाचे राखण करण्याची गरज नाही. संरक्षण होते. हे पीक हरभऱ्याच्या तुलनेत कमी खर्चाचे आहे. शिवाय पाणीही कमी लागते. याशिवाय किडींचा प्रतिकार करण्याची क्षमता  जास्त आहे.
-एन. व्ही. तावस्कर,  तालुका कृषी अधिकारी, नागभीड

Web Title: Farmers struggle to get out of traditional farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती