शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकरी पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:39 IST

गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देचिमूर तालुक्यातील मांगलगाव येथील घटना

चंद्रपूर : शेतात खत मारत असताना पावसाने तुटून शेतात पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिमूर तालुक्यातील मांगलगाव येथे गुरुवारी घडली. रोशन श्रीहरी ढोणे (२४, रा. मांगलगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.

मागील दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस पडला आहे. गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच भिसी पोलीस, वीज कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

दरम्यान, अवकाळी पाऊस व गारपिटिने पूर्व विदर्भात पिकांचे मोठे नुकसा झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळोधी बा. परिसरात पावसामुळे विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आणलेले खुल्या आवारात असलेली धानाची पोती भिजली, असून आता करावे तरी काय, अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूRainपाऊसHailstormगारपीटFarmerशेतकरीagricultureशेतीweatherहवामान