आदिवासी सेवा सहकारी संस्थेत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:57+5:302020-12-22T04:27:57+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संस्था देवाडा येथे मागील ३० वर्षापासुन कार्यरत असताना व परिसरातील १७ गावातील शेतकऱ्यांना शेतीचे आधारे पीक ...

आदिवासी सेवा सहकारी संस्थेत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संस्था देवाडा येथे मागील ३० वर्षापासुन कार्यरत असताना व परिसरातील १७ गावातील शेतकऱ्यांना शेतीचे आधारे पीक कर्ज व इतर व्यवहार याच संस्थेच्या मार्फत होते. अता ही संस्था मौजा देवाडा येथून सिद्धेश्वर येथे हलवण्याचा निर्णय येथील संचालक मंडळाने घेतला. या निर्णयाच्या विरोधात गोंडवाना गणतंत्र पार्टी व मित्र पक्ष व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन करून सदर निर्णय रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनानंतर संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देवाडा येथील आदिवासी संस्था देवाडा येथेच ठेवण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी पंचायत समिती सदस्य अब्दुल जमिर अब्दुल हमीद ,देवाडाचे माजी सरपंच माणिक कुलसंगे व तसेच मित्र पक्ष्याचे ईश्वर मुंडे, श्रीनिवास मंथनवार ,संजय आत्राम,शंकर मडावी तंटामुक्ती समिती सदस्य,विष्णू घुले, वसंत आत्राम, शेख जाहीर,भगवान हरणधारे, सुभाष तेलीवार,कवडू तपासे, गुलाब मेश्राम, शेख सलीम,शंकर टेकाम,महेश बल्लावार व शेकडो शेतकरी उपस्थित होते