शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:37+5:302021-02-06T04:50:37+5:30
उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे, टीएजी-२४, टीजी-२६ किंवा एसबी-११ ...

शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेती करावी
उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. पेरणीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे, टीएजी-२४, टीजी-२६ किंवा एसबी-११ या वाणांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेनडेंझिम किंवा मँकोझेब ३ ते ५ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे लावून बीज प्रक्रिया करावी.
हरभरा फूल ते घाटेअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावेत.
घाटेअळीने आर्थिक नुकसानीची पातळी पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क करावी. उन्हाळी धान –नर्सरी ते रोपांची पुनर्लागवड धान रोपवाटिकेत पेरणीनंतर १५ दिवसांनी तण काढून टाकावे व नंतर दर गुंठ्यास एक किलो युरिया द्यावा. रोपांचे वय २१ ते २५ दिवसांचे झाल्यावर रोवणी करावी. त्यासाठी रोपे काढण्याच्या दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी. त्यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे काढण्यास मदत होते. पूर्वमशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलणी करावी. चिखलणीनंतर शेत समपातळीत येण्यासाठी पाटी (फळी) फिरवावी.