लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : आदिवासीबहुल कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता प्रगतीसाठी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले़ नांदा फाटा येथील हरीओम मदर डेरीला शुक्रवारी भेट दिल्यानंतर ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते़यावेळी जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, पवन यादव, पुरुषोत्तम निब्रड, हरीओम यादव, शिव निषाद, प्रभाकर जोगी, गुणवंत काकडे, सुनील भोयर, शुघर पंडित, हरिभाऊ बोरकुटे, सुरज लडके, आकाश काकडे, मनोज हस्तक, अनिल बोढाले, स्वप्निल झुरमुरे आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी सलिल म्हणाले, जोडधंदा म्हणून दुधाळू जनावर पालन करणे गरजेचे आहे़़ तालुक्यातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे आशावादी दृष्टीने बघत आहे़ दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना देण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत़ त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे़तालुक्यात हरीओम मदर डेरी ही एकमेव असल्यामुळे आजूबाजुच्या २० ते २५ गावातील दूध या डेरीमध्ये चांगल्या दराने विकत घेतले जात आहे़ शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला जोडधंदा म्हणून स्वीकारला़ पण, प्रमाण अद्याप वाढले नाही़ शेकडो शेतकऱ्यांनी व्यावसायिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केल्यास अनेक समस्या मार्गी लागतील़नांदा फाटा येथील डेअरीला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी सलील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला़ शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली़ तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शासन मदत करणार आहे, अशी ग्वाही दिली़ राष्ट्रीयीकृत बँकेने मुद्रा लोन नाकारल्यास संपर्क साधावेख असेही त्यांनी सांगितले़ मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापडकर यांनीही मार्गदर्शन केले़ यावेळी शेतकरी उपस्थित होते़
शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:44 IST
आदिवासीबहुल कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता प्रगतीसाठी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले़ ......
शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा
ठळक मुद्देआशुतोष सलिल : शेतकऱ्यांना दिली शासनाच्या योजनांची माहिती