पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By Admin | Updated: October 5, 2014 23:02 IST2014-10-05T23:02:39+5:302014-10-05T23:02:39+5:30
‘हत्ती आणि हलक्या प्रतिच्या धानाची माती’ अशी युक्ती ग्रामीण भागात प्रचलित आहे. हस्त या नक्षत्रात हमखास पाऊस पडतो, असे ग्रामीणांचे मत आहे. मात्र, हस्त नक्षत्र लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे.

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
भारनियमनाचा फटका : पिके करपण्याच्या मार्गावर
चंद्रपूर : ‘हत्ती आणि हलक्या प्रतिच्या धानाची माती’ अशी युक्ती ग्रामीण भागात प्रचलित आहे. हस्त या नक्षत्रात हमखास पाऊस पडतो, असे ग्रामीणांचे मत आहे. मात्र, हस्त नक्षत्र लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे हलक्या तसेच जड प्रतीच्या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
महावितरणच्या भारनियमनाचा सार्वाधीक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कृषी पंपाचा वापर वाढल्याने निर्माण झालेली वीज टंचाईचा कारण समोर करुन महावितरणने जिल्ह्यातील १०३ वाहिन्यांवर भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे त्यांनाही शेताला पाणी देण्यास अडचणी येत आहेत. पावसाच्या हुलकावणीमुळे वातावरणातील उष्णता वाढली आहे. परिणामी विजेची मागणीही वाढली आहे.
अचानक उद्भवलेल्या परिस्थीमुळे भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरनने म्हटले आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे, धान, सोयाबिन, कपाशी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अ गटात ३२ विजवाहिन्या, बी गटात ३६, सी गटात ६, डी गटात ६१२, इ गटात ५, एफ गटात ८ तर जी गटात १० विजवाहिन्या आहेत. यामध्ये अ गटातील वीज वाहिन्यांवर ३५ मिनिट, बी गटात ४५ मिनिट, सी गटात ४ तास ४५ मिनिट, तर डी गटातील विज वाहिनीवर ३० मिनिटाचे भारनियमन करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)