शेतकऱ्यांचे रबी हंगामातील नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:13+5:30

हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व्यवसाय तोट्यात चालला आहे.

Farmers' planning for the Rabi season collapsed | शेतकऱ्यांचे रबी हंगामातील नियोजन कोलमडले

शेतकऱ्यांचे रबी हंगामातील नियोजन कोलमडले

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांवर आर्थिक संकट : कापणी व बांधणीसाठी तीन हजार रूपये एकर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदाच्या खरीप हंगामात धानपीक ऐन गर्भवस्थेत असताना दिवाळीच्या पूर्वी ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.
जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व्यवसाय तोट्यात चालला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. शेतकºयांनी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेऊ न धानपीक लागवडीचा खर्च केला. धानपीक जोमात असताना परतीच्या पावसाने नुकसान केले. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी धानपीक कापणी व बांधणीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, या कामाचे दर गतवर्षीपेक्षा यंदा वाढले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकट ओढावल्याने आर्थिक परिस्थिती खिळखिळी झाली आहे. परंतु, अशाही स्थितीत कापणी बांधणीचे दर स्थित राहतील किंवा कमी होतील, असा अंदाज जिल्ह्यातील शेतकºयांना होता. परंतु सध्या उलट स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात धान कापणी व बांधणीसाठी प्रती एकर २ एकर ८०० रूपये गुत्ताच्या स्वरूपातून घेतले जात आहेत. काही ठिकाणी कापणी व बांधणीसाठी दीड हजार असे एकूण तीन हजार रूपये घेतले जात आहे. यंत्राच्या सहाय्याने धानाची मळणी केली जात असून प्रती पोते ५०, ५५ व ६० रूपये घेतले जात असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

Web Title: Farmers' planning for the Rabi season collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी