चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:30 IST2018-12-04T11:29:49+5:302018-12-04T11:30:21+5:30
वरोरा तालुक्यातील अर्जुनी या गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील अर्जुनी या गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. हा शेतकरी शेतामधील धान्याची राखण करून घरी परतत असताना त्याच्यावर वाघाने हल्ला चढवला. या शेतकऱ्याचे नाव देवराव भिवाजी जीवतोडे असे आहे. या गावातील तीन नागरिक महिन्याभरात वाघाच्या हल्ल्याला बळी पडले आहेत. ४ नोव्हेंबर रोजी तुळसाबाई केदार (६२) या महिलेवर वाघाने हल्ला चढवला होता. नंतर दुसऱ्याच दिवशी ५ नोव्हेंबरला आदर्श विकास हणवते या सहा वर्षांच्या बालकावर त्याने हल्ला केला. या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत व वाघाच्या बंदोबस्ताची मागणी करीत आहेत.