शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धानाच्या उतारीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ३० टक्केच उतारी

घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांचे धान पिकावर आक्रमण याचा परिणाम धान पिकाच्या उतारीवर झाला आहे. हातात येत असलेली उतारी पाहून शेतकऱ्यांचे स्वप्न पार चुराडा होत आहे. सरासरीच्या ३० टक्केच उतारी येत असल्याने शेतकऱ्यांसमोर ऐन दिवाळीत आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे. धानाची कापणी झालेल्या शेतकऱ्यांनी मळणीस सुरूवात केली असून धानाची उतारी पाहून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. सर्वसामान्यपणे एका एकरातून किमान १७ ते २० पोती धानाची उतारी यायला पाहिजे. पण यावर्षी ८ ते ९ पोतीच उतारी येत आसल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षा कमी उतारी येत आहे. धान कापणी, बांधणी आणि मळणीस परवडत नाही म्हणून काही शेतकरी धानाची कापणीच न करण्याचा विचार करीत आहेत. या संकटाने तालुक्यातील शेतकरी खचले आहेत. आवते, पऱ्हे भरण्यापासून तर रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणी करेपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी १४ ते १५ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. अशी आपत्ती ओढवली तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज कोणीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला नाही. शेतीचा हंगाम करताना एकतर शासकीय नाही तर खासगी कर्जाची उचल करूनच शेती करावी लागते. आता उचल केलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी आणि घरी काय ठेवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. 

मळणीयंत्र मालक बेजारधानाची उतारी लक्षात घेता धानाची मळणी करणारे मशीन मालक चांगलेच वैतागले आहेत. कापणी केलेल्या धानाचे पुंजणे मोठे दिसत असल्या तरी त्यातून निघणारी धानाची पोती अतिशय कमी राहत आहेत. त्यामुळे मशीन आणि मजुरांनाही परवडत नाही. त्यामुळे अनेक मशीन मालकांनी आता पोत्याच्या संख्येनुसार मोबदला घेण्याऐवजी डिबली किंवा एकराच्या हिशेबानुसार मोबदला घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती