शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

हस्त नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव बघता दरवर्षी पावसाची प्रतिक्षा करावी लागते. यावर्षीही सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून दररोज पाऊ स कोसळत आहे. कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. अनेक गावात पुर परिस्थती निर्माण झाली. भात पिकांच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने पिक सडण्याची भिती निर्माण झाली.

ठळक मुद्देवरूणराजा आता तरी थांब : भात पिकासह भाजीपाला पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसाने सर्वसामान्यच नाही, तर शेतकरी सुध्दा आता पुरते कंटाळले आहेत. वरूण राजा आतातरी थांब, अशी आर्त विणवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून उत्तरासह हस्त नक्षत्रातील जोरदार पावसामुळे भातपिकासह भाजीपाला पिक धोक्यात आले आहे.गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव बघता दरवर्षी पावसाची प्रतिक्षा करावी लागते. यावर्षीही सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून दररोज पाऊ स कोसळत आहे. कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. अनेक गावात पुर परिस्थती निर्माण झाली. भात पिकांच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने पिक सडण्याची भिती निर्माण झाली. नदी, नाल्यांच्या तिरावरील शेतशिवाराला पुराचा फटका बसला. यामुळे शेतकरी आता धास्तावले आहे. महिन्याभरात असा एकही दिवस गेला नाही की, पाऊ स आला नाही. शनिवार, रविवार तसेच सोमवारी रात्री शहरासह जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. हस्त नक्षत्रातील पावसात प्रचंड विजेचा कडकडाटही सुरु होता.रोगांचा प्रादूर्भावचंद्रपूर : वातावरणातील बदल, दमटपणा व अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात धानपिकावर लष्करी अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेतातील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा कीटनाशकाची फवारणी केली आहे. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दमट वातावरणामुळे तथा अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. याशिवाय खोडकीडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.दुष्काळ जाहीर करण्याची मागणीजिल्ह्यात अतिवृष्टीचे सावट आहे. मात्र अद्यापही कृषी विभागाने सर्वेक्षण केले नसल्याची ओरड शेतकऱ्यांची असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दमट वातावरणामुळे तथा अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. याशिवाय खोडकीडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती