शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

राजुराच्या जंगल सफारीविरोधात शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:51 IST

राजुरा : मध्य चांदा वनविभागांतर्गत येत असलेल्या राजुरा वनपरिक्षेत्रात जंगल सफारी सुरू करण्यात येत असून, याकरिता वनविभागाने २८ पर्यटनस्थळे ...

राजुरा : मध्य चांदा वनविभागांतर्गत येत असलेल्या राजुरा वनपरिक्षेत्रात जंगल सफारी सुरू करण्यात येत असून, याकरिता वनविभागाने २८ पर्यटनस्थळे तयार केली आहेत. या माध्यमातून वनविभाग वनपर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करीत असला तरी या जंगल सफरीला जंगलव्याप्त परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने वन कार्यालयासमोर १८ फेब्रुवारीला एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.

वनविभाग राजुरा वनपरिक्षेत्रातील अंदाजे १० हजार हेक्टरमध्ये जंगल सफारी सुरू करीत आहे, या वन पर्यटनाकरिता विभागाने जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी २८ पर्यटन स्थळे तयार केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत जंगल सफारी सुरू होणार आहे. या माध्यमातून वन पर्यटनाला चालना देण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहेे; पण या सफारीला जंगलव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे . या जंगल सफारीमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासावर मोठे प्रशचिन्ह निर्माण होणार आहे. पर्यटक व वाहनांच्या गोंगाटामुळे वन्यप्राणी जंगलाबाहेर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी या सफरीला विरोध केला आहे. वनविभागाच्या या घातकी निर्णयाविरोधात किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने वन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती समितीचे तालुकाप्रमुख प्रदीप बोबडे यांनी दिली.