शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

शेतशिवार कृषिपंपांनी बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:23 IST

चंद्रपूर परिमंडळात गेल्या तीन वर्षात तब्बल २४ हजार २३५ नवीन कृषिपंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचली आहे. अविरत संघर्षानंतर शेतकऱ्यांना कृषिपंप मिळाल्याने त्यांचे शेतही बहरले आहे.

ठळक मुद्देबळीराजाला दिलासा : तीन वर्षांमध्ये २४ हजार २३५ शेतात कृषिपंप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर परिमंडळात गेल्या तीन वर्षात तब्बल २४ हजार २३५ नवीन कृषिपंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचली आहे. अविरत संघर्षानंतर शेतकऱ्यांना कृषिपंप मिळाल्याने त्यांचे शेतही बहरले आहे.वर्ष २०१४-१५ मध्ये सहा हजार ८५, वर्ष २०१५-१६ मध्ये आठ हजार ४८२, वर्ष २०१६-१७ मध्ये सात हजार ८४४, वर्ष २०१७-१८ या वर्षात एक हजार ३३७ व २०१८-१९ या चालू वर्षात ४८७ अशा एकंदरीत २४ हजार २३५ कृषिपंपधारकांना आतापर्यंत वीजजोडणी मिळाली आहे. यामुळे या शेतकऱ्यांची जमीन आता ओलिताखाली येणार आहे. चंद्रपूर मंडळातील चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर या तीन विभागात एकंदरीत १२ हजार ४७९ तर गडचिरोली मंडळातील गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपुरी विभागातील ११ हजार ७५६ कृषिपंपधारकांच्या जीवनात हसू फुलले आहे.एक रोहित्रावरून आता दोन ते तीन कृषिपंपांनाच जोडणीया नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषी पंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही, तो जळणार नाही, आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडळाने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.उच्चदाब वितरण तंत्रया तंत्राचा (एचव्हीडीएस) वापर करून अधिक व्होल्टेज असलेल्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मर्यादित ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य आहे. थेट वितरण रोहित्रावरून वीज दिली जाणार असल्याने वीज हानी रोखण्यास मदत मिळणार आहे. यातून कृषी पंपांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.५० हजार ३६५ कृषिपंपांचे ऊर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेमध्ये विदर्भातील ८०४ कोटीच्या विविध कामांची २३१ पारदर्शक निविदांमार्फ़त आॅनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यात विदर्भातील तब्बल ५० हजार ३६५ कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले असून या योजनेतील कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत, यासाठी उपविभागनिहाय कामांची आखणी करण्यात येऊन त्यानुसारच निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.कृषिपंपांना मिळणार उच्चदाबाचा शाश्वत वीजपुरवठाशेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच ‘हाय व्होल्टेज’ वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतील कामांची आॅनलाईन निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत यापुढे एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. यामुळे सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात सुमारे ८०४ कोटी रुपये मुल्याच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या योजनेसाठी लागणाऱ्या वितरण रोहित्रांची खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुख्यालयाकडून यापुर्वीच सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर सर्व्हेक्षण करण्यात येऊन योजना तयार करण्यात आली. यानुसार महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात ३१ मार्च २०१७ सोबतच ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एचव्हीडीएस’ योजनेतून जोडणी दिली जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज