सेवानिवृत्त कामगार भावंडांना वाजत-गाजत निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:23 IST2020-12-26T04:23:14+5:302020-12-26T04:23:14+5:30
फोटो कोरपना : अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे कार्यरत जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील कामगार शेख ...

सेवानिवृत्त कामगार भावंडांना वाजत-गाजत निरोप
फोटो
कोरपना : अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे कार्यरत जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील कामगार शेख रशीद व शेख अब्बास या दोन्ही कामगारांना सेवानिवृत्तीचे औचित्य साधून बँड पथकाने वाजत गाजत कार्यरत स्थळापासून घरापर्यंत मिरवमूक काढण्यात आली.
या दोन्ही भावंडांनी यांनी ३८ वर्ष अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे सेवा दिली असून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याजवळ शाल श्रीफळ देऊन सेवानिवृत्त झालेल्यादोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, बीबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर अस्वले, राष्ट्रसंत युवा मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती ढवस, उत्तम काळे विलास राजुरकर, नथ्थु काकडे, गजानन देरकर, अरुण ढवस, शेख सिकंदर, शेख पापा, हत्तीमारे, शेख रहीम, शेख वसीम यांच्यासह गावकरी उपस्थित होते.