मुख्याध्यापक नामदेव राऊत यांचा निरोप समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:30+5:302021-03-14T04:25:30+5:30
मूल :पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसुर्ला येथील मुख्याध्यापक नामदेव राऊत यांची बढती विस्तार ...

मुख्याध्यापक नामदेव राऊत यांचा निरोप समारंभ
मूल :पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसुर्ला येथील मुख्याध्यापक नामदेव राऊत यांची बढती विस्तार अधिकारी म्हणून झाली. त्यांची पंचायत समिती गोंडपिपरी येथे नियुक्ती केल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष ठाकरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती मूलचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे, केंद्र प्रमुख गजेंद्र कोपुलवार, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टिकले आदी उपस्थित होते. यावेळी नामदेव राऊत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राऊत यांनी संगितले की, गेले ३४ वर्ष मूल पंचायत समितीमध्ये आपला कार्यकाळ गेला असून गावात वावरताना पालक संपर्क महत्त्वाचा असतो. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला तर विद्यार्थी घडविण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. आपला ३४ वर्षाचा कार्यकाळ खेळीमेळीच्या वातावरणात गेल्याचे सांगितले. संचालन शिक्षक प्रशांत कवासे तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक विजय दुधे यांनी मानले.