शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

वैभवसंपन्न गावतलाव अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: April 8, 2016 00:58 IST

शहरात अतिक्रमण वाढत आहे. आता गावतलावसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

संबंधितांचे दुर्लक्ष : तलावाच्या पाळीवर घरांचे बांधकामसावली : शहरात अतिक्रमण वाढत आहे. आता गावतलावसुद्धा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अंदाजे ५६ एकर जमीन या तलावात आहे. आजूबाजूचे शेतकरीदेखील तलावाच्या जागेचा वापर करुन हळूहळू अतिक्रमण करीत आहे. तलावाच्या पाळीवर घरे होत आहेत. पाळी शेजारी गुरांढोरासाठी गोठ्याचे बांधकाम कच्चे स्वरूपात झालेले दिसते. नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यास एक दिवस तलावच दिसणार नाही.शहराला लागून असणारा हा गावतलाव मध्यभागी आहे. या तलावाला वैभवाची परंपरा लाभली आहे. महिला-पुरुष मंडळी दरवर्षी गौरी विसर्जन, गणेश, शारदा विसर्जन याच तलावात करतात. शहरातील असंख्य महिला याच तलावात कपडे धुतात. बैलांना पाणी व आंघोळीसाठीही याच तलावाचा वापर केला जातो. पूर्वी शंकरपट याच तलावात भरत होते. मोठ्या प्रमाणात बैलांची व माणसांची गर्दी राहायची. वैभवसंपन्न असणाऱ्या हा तलाव आज उपेक्षिताचे जिणे जगत आहे.या तलावाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना व्हायचा. पण आता अनेक जमिनी अकृषक होवून तेथे ले-आऊट पाडले आहेत. जिथे हिरवेगार पिक दिसायचे, तिथे सिमेंटच्या इमारती दिसतात. काही मोजक्या शेतकऱ्यांना आता या तलावाचा फायदा होतो. गोसीखुर्दचे पाणी मिळणार असल्याने हा तलाव उपेक्षितच राहणार आहे. या अगोदरच्या ग्रामपंचायत कमेटीने अनेकदा ठराव घेऊन शासकीय कार्यालये, निवासस्थाने तलावाच्या वरच्या भागात झाली पाहिजे, क्रीडांगण झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. शासकीय कार्यालये, निवासस्थाने यासाठी सावली नगरात जागेची कमतरता आहे. गाव तलावाच्या जागेचा वापर केल्यास शासकीय कार्यालये व निवासस्थाने शहरातच होवू शकतात. यासाठी नगरपंचायतने पुढाकार घ्यावा, अशी सावली नगरवासीयांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)