चिमुकल्याच्या मृतदेहासह कुटुंबीय ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:40+5:30

मागून येणारा श्री ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ०७८८ ने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वेदांत गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान आज वेदांतची प्राणज्योत मालवली.

The family At Police station with the dead body | चिमुकल्याच्या मृतदेहासह कुटुंबीय ठाण्यात

चिमुकल्याच्या मृतदेहासह कुटुंबीय ठाण्यात

Next
ठळक मुद्देट्रक चालकाला सोडल्याने संतप्त : पोलिसांनी बळजबरीने मृतदेह हलविला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वडिलासोबत दुचाकीवर जात असलेला वेदांत अमृत नाईक (९) हा ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाला. २५ ऑक्टोबर रोजी येथील जनता कालेज चौकात हा अपघात घडला. जखमी वेदांतचा शुक्रवारी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रकवर कोणतीही कारवाई केली नाही, यामुळे संतप्त झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी वेदांतच्या मृतदेहासह येथील रामनगर पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन केले. दरम्यान त्यांचे पोलिसांनी काहीही न ऐकता बळाचा वापर करून मृतदेह हलविल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
चंद्रपूर येथील मेजर गेट वैद्यनगर परिसरात राहणारे अमृत नाईक हे २५ ऑक्टोबर रोजी मुलगा वेदांतला (इयत्ता तिसरी) घेऊन अ‍ॅक्टीवा क्रमांक एमएच ३४ बीके १८६८ ने जनता कॉलेज चौकातून वरोरा नाकाकडे जात होते. दरम्यान मागून येणारा श्री ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ०७८८ ने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वेदांत गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान आज वेदांतची प्राणज्योत मालवली. अपघाताच्यावेळी ज्या ट्रकने धडक दिली. त्या ट्रकचालक तसेच मालकाला पोलिसांनी सोडून दिल्याची बाब वेदांतच्या नातेवाईकांना कळली. या प्रकरणी पोलिसांसह ट्रक मालकाने साधी विचारपूसही न केल्याने कुटुंबीय संतप्त झाले. पोलिसांनी धडक देणाºया ट्रकवर कारवाई करून वेदांतला न्याय द्यावा. अशी मागणी करीत मृतदेह थेट रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवला. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रामनगर पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, पोलिसांनी दंगानियंत्रक पथकाला पाचारण केले होते. कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत ठाण्यात ठेवलेला मृतदेह परस्पर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. यावेळी कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. मृतदेह उचलल्यानंतर चंद्रपूर-मूल मार्गावर मृतदेह असलेले वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांपुढे त्यांचे काही एक चालले नाही. दरम्यान, शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांनी रामनगर पोलीूस ठाण्यात येऊन पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त करून ट्रक चालकावर कारवाईची मागणी केली.

उपचारासाठी नागरिकांनी केले पैसा गोळा
वेदांत हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता. त्याच्यावर उपचारासाठी पैसा नसल्याने मेजर गेट वैद्य नगर परिसरातील नागरिकांनी पैसा गोळा करून त्याच्या आईवडिलांना मदत केली. विशेष म्हणजे, मुलाच्या अपघातामुळे येथील नागरिकांनी दिवाळीसुद्धा साजरी केली नाही. हे विशेष.
रामनगर पोलिसांवर रोष
२५ ऑक्टोबर रोजी अपघात झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या वेदांतकडे पोलीस अथवा ट्रक मालकाने लक्ष दिले नाही. उलट पोलिसांनी ट्रक तसेच चालकाला सोडून दिले. त्यामुळे कुटुंबीयांनी रामनगर पोलिसांवर विविध आरोप करीत आपला रोष व्यक्त केला.

Web Title: The family At Police station with the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात