शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष लोटूनही अवैध दारूविक्री रोखण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:21 IST

राज्य शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने जिल्ह्यातील महिलांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते

महिला वर्ग त्रस्त : प्रभावी अंमलबजावणीची मागणीराजुरा : राज्य शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. या निर्णयाने जिल्ह्यातील महिलांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: ग्रामीण भागात तर दारूबंदीच्या निर्णयाने महिलांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला होता. परंतु महिनाभर होत नाही तोच अवैध दारूविक्रीने सर्वत्र जिल्हाभर थैमान घातले. ही दारूबंदी प्रभावी राबवावी, यासाठी सामाजीक संस्था, महिला मंडळे व लोकप्रतिनिधीकडून पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. पण दारूबंदीला एक वर्षाचा काळ लोटूनही यावर लगाम लावण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राजुरा तालुका हा आधीपासून मागासलेला आहे. या तालुक्यात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने कामानंतर मद्य पिणाऱ्यांची लक्षणीय संख्या ही राजुरा शहरात बघायला मिळत होती. पण दारूबंदीच्या निर्णयानंतर हे प्रमाण अंशत: नाहीसे, होईल अशी जनसामान्याची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा दारूबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही अपेक्षाभंग होत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.राजुरा शहरात सध्या ‘फोन करा, दारू मिळवा’ अशी स्थिती निर्माण झाली असुन दारूची घरपोच सुविधा सुरू आहे. या अवैध दारूविक्रीच्या धंद्यात मोठ्यासह विद्यार्थी व महिलाही मोठ्या संख्येने गुंतल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात अधिकाऱ्यांनी दिलेला टार्गेट पूर्ण करण्याच्या व प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काही तुटपुंज्या कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहे. आजही राजुरा तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून दारूची सर्रास वाहतूक होत असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे.दारूबंदी निर्णयानंतर तेलंगणा राज्यातील दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून लक्कडकोट येथे तपासणी नाका उभारण्यात आला होता. त्या नाक्यावर तेलंगणा राज्यातून येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. मात्र काही दिवसांनी स्थानिक प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाच्या अभावाने उभारण्यात आलेला तपासणी नाका काढण्यात आला. यामुळे दिवसरात्र सर्रास दुचाकी तर कधी चारचाकी वाहनाने दारूची तस्करी होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)