लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. आग विझविण्यासाठी वनविकास महामंडळाकडे अद्यावत यंत्रणा नाही. काही ठिकाणी आग विझविण्यासाठी आग प्रतिबंधक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत, तर काही ठिकाणी आग नियंत्रणासाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही.कन्हारगाव वनक्षेत्रातील कक्ष क्र. ६७ मध्ये लागलेल्या आगीत बांबू, बांबू बंडल, बिट, फाटे व इमारती लाकूड जळाले. कन्हारगाव, झरण वनक्षेत्रातील कक्ष क्र. ५, १७, १३, १०८, १४, ७६, १२४, १२३, ८२, ८१, ६, १३२, ६८, ७२, ७३, १९, १८, १७, १६, १, २, ३ व ६७ मध्ये मोठ्या प्रमाणात वनवा भडकला. यात बांबू, बिट, फाटे, बांबू बंडल, इमारती लाकूड जळाले आहे. मागील वर्षी निष्कासित करण्यात आलेला लांब बांबू व बांबू बंडल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक झाला नाही. तो पूर्णत: जळाला आहे.बल्लारशाह विभागाअंतर्गत झरण कन्हारगाव, तोहोगाव व धाबा वनक्षेत्र असून त्याअंतर्गत ३२ हजार हेक्टरवर मौल्यवान जंगल आहे. या जंगलात दरवर्षी विविध निष्कासनाची कामे केली जातात. त्यातील वनउपजाची वाहतूक विक्री डेपोवर होत नसल्याने वनउपज जळून खाक झाले आहे.कक्ष जळाल्यानंतर त्याचा पीओआर करावा लागतो. मात्र वनरक्षक प्रत्यक्ष जळालेले क्षेत्र न दाखविता, अल्प क्षेत्र दाखवून स्वत:ला संरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी जळालेल्या क्षेत्राचे पीओआर केले नसल्याची माहिती आहे. तर काहींनी त्याची सत्य माहिती कारवाईच्या भितीने वनविभागाला दिली नाही. यावर्षी वनव्यात भरपूर जंगल, वनउपज जळला असून त्याची चौकशी होणे आवश्यक असून जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नुकसानजंगलात आग पसरू नये, यासाठी जाळरेषा व पालापाचोळा दहा मिटर अंतरावर जाळण्यात येते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र अधिकारी कामचलावू धोरण अवलंबून दर्शनी भागात कामे करतात व आतील कामे करीत नाही. परिणामी वनवा जंगलभर पसरतो. यात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व खाबुगीरीने जंगलाचे नुकसान होत आहे. आगी लागल्यानंतर ही माहिती जबाबदार वनरक्षक, वनपालांनी आग यंत्रणेला द्यावी लागते. मात्र ती माहिती दडविली जात आहे.
एफडीसीएमच्या जंगलात भडकला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:13 IST
वनविकास महामंडळ मध्य चांदा विभागाअंतर्गत कन्हारगाव-झरण वनपरिक्षेत्रात मागील आठ दिवसांपासून विविध कक्षात भर दिवसा आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यात हजारो हेक्टरवरील वन आगीत राख झाले असून यात लाखो रुपयांची हानी झाली आहे.
एफडीसीएमच्या जंगलात भडकला वणवा
ठळक मुद्देकन्हारगाव-झरण क्षेत्रातील जंगलाची राख : बांबू, फाटे, इमारती लाकडे जळाली