ंपर्यवेक्षकांकडून काँग्रेस उमेदवारांची चाचपणी
By Admin | Updated: July 19, 2014 00:57 IST2014-07-19T00:57:18+5:302014-07-19T00:57:18+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसने

ंपर्यवेक्षकांकडून काँग्रेस उमेदवारांची चाचपणी
चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसने प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे पर्यवेक्षक १९ व २० जुलैला सर्व विधानसभा क्षेत्रात जाऊन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असून इच्छुक उमेदवारांची चाचपणीही करणार असल्याची माहिती आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे प्रवक्ता आमदार नदीम जावेद यांना पक्षाने चंद्रपूर जिल्हाचे पर्यवेक्षक व संजय दुबे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे. हे दोन्ही पदाधिकारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात जाऊन कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करतील. १९ जुलैला वरोरा, राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर तालुक्यात तर २० जुलैला ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली होती. त्यामुळे यावेळी काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांची कसून चाचपणीही केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)