शेतीलाच मानले सर्वस्व

By Admin | Updated: October 21, 2015 01:17 IST2015-10-21T01:17:56+5:302015-10-21T01:17:56+5:30

अपयश हाच माणसाचा पहिला गुरु असतो, असे म्हणतात. या अपयशातून कोणी काही बोध घेतला तर तो प्रगतीचा कितीही टप्पा गाठू शकतो, हे डोंगरगावच्या शंकर पाथोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Everything is considered by the farm | शेतीलाच मानले सर्वस्व

शेतीलाच मानले सर्वस्व

शेती व्यवसायात नवा पायंडा : भाजीपाला पिकाने झाली आर्थिक उन्नती
घनश्याम नवघडे नागभीड
अपयश हाच माणसाचा पहिला गुरु असतो, असे म्हणतात. या अपयशातून कोणी काही बोध घेतला तर तो प्रगतीचा कितीही टप्पा गाठू शकतो, हे डोंगरगावच्या शंकर पाथोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करुन पाथोडे यांनी परिसरात नवा पायंडा पाडला आहे.
शंकर पाथोडे यांना वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. या शेतीला जोडव्यवसाय म्हणून ते टेलरींगचा व्यवसाय करायचे. पण एवढे करुनही आर्थिक अडचण ही पाचविला पुजलेली. अशातच त्यांना कोणीतरी रेशीम (तुर्ती) उद्योग करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार त्यांनी तो व्यवसाय केला. पण अपयशच पदरी आले. आर्थिक दृष्टया अतिशय दयनीय अवस्था त्यांच्यावर आली. यातून मार्ग कसा काढायचा, या विवंचनेत ते असताना गावातीलच आनंदराव पाथोडे यांनी त्यांंना भाजीपाला लागवडीचा सल्ला दिला. हा सल्ला शिरसावंदय माणून त्यांनी वडिलोपार्जित शेतीत भाजीपाला पिकाची लागवड केली.
वर्ष दोन वर्षात त्यांना बऱ्यापैकी पैसा दिसून लागला. शंकररावांचा उत्साह आणखीच वाढला. त्यांनी या व्यवसायात स्वत:ला पूर्ण वाहून घेतले. आता ते कोणतेही प्रशिक्षण न घेता अगदी आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करीत आहेत. या मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी आणखी पाच एकर शेती खरेदी केली आहे.
पाथोडे आता सात एकरात वर्षभर भाजीपाला पिकाची तर तीन एकरात धानाची लावगड करीत आहे. त्यांनी संपुर्ण कुटुंबाला याच व्यवसायात वाहून घेतले आहे. सकाळी ६ वाजता त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतावर हजर होते आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शेतावर असतात. या व्यवसायात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पाथोडे यांनी शेतात आठ ठिकाणी बोअर तर दोन ठिकाणी विहिरी खोदल्या आहेत.
या विहिर आणि बोअरच्या माध्यमातून ते वर्षभर कारले, चवळी, वांगी, टमाटर, भेंडी, कोबी, पानकोबी, मेथी, पालक, कोथिंबीर यांचे उत्पादन घेत असतात. या पिकातून वर्षाकाठी त्यांना १२ ते १३ लाखांचे उत्पन्न मिळत असून खर्च वजा जाता त्यांना आठ ते नऊ लाखांचा निव्वळ नफा उरत असतो. आज नागभीडमध्ये दररोज भाजीपाला येत असतो यातील निम्मा भाजीपाला डोंगरगाव येथीलच असतो. पुर्वी पाथोडे मोटार सायकलने भाजीपाल्याची वाहतूक करायचे गरज म्हणून त्यांनी आता टेंपो खरेदी केला असू त्याचा आणखी फायदा त्यांना होत आहे.

Web Title: Everything is considered by the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.