सर्वांनी काळजी घेणे गरजेचे: संख्या गुरुनुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:28 IST2021-04-16T04:28:34+5:302021-04-16T04:28:34+5:30

मूल : कोरोना या रोगावर कसा आळा घालता येईल, यासाठी प्रयत्न करावे. कोरोना या रोगाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ...

Everyone needs to be careful: number gurus | सर्वांनी काळजी घेणे गरजेचे: संख्या गुरुनुले

सर्वांनी काळजी घेणे गरजेचे: संख्या गुरुनुले

मूल : कोरोना या रोगावर कसा आळा घालता येईल, यासाठी प्रयत्न करावे. कोरोना या रोगाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली येथे रुग्णांना फळ वाटप व लसीकरण केंद्रात व्यक्त केले.

कार्यक्रमाला मूल पंचायत समितीच्या सदस्य वर्षा लोनबले, चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाटाडे, मूल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जीवन प्रधान, चिरोलीच्या सरपंच मीनल लेनगुरे, माजी सरपंच सुभाष बुक्कावार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन नीलेश मुके यांनी केले. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Everyone needs to be careful: number gurus