शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभापतींना अखेर खातेवाटप

By admin | Updated: November 10, 2014 22:40 IST

जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली. एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड करण्यात आली.

चंद्रपूर : जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली. एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड करण्यात आली. याचवेळी सभापतींचीही निवड करण्यात आली होती. मात्र सभापतींच्या खातेवाटपाची प्रक्रिया रखडली होती. अनेक दिवसांपासून विभागांना सभापतिपद मिळाले नसल्याने काही प्रमाणात विकास कामांची गती मंदावली. मर्जीतील खाते मिळावे यासाठी भाजपातील काही सदस्यांचे रुसवे-फुगवे दूर झाल्यानंतर आज निवड प्रक्रिया पार पडली. मर्जीतील खाते मिळाले नसल्याने आज काही सभापतींमध्ये नाराजी आहे.बांधकाम सभापतिपद मिळावे यासाठी देवराव भोंगळे, ईश्वर मेश्राम दोघेही प्रयत्नात होते. यासाठी जोरदार रस्सीखेचही झाल्याचे समजते. ज्या दिवशी सभापतींची निवड झाली तेव्हा मेश्राम तसेच भोंगळे या दोघांनीही बांधकाम खाते मिळणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. आज पार पडलेल्या सभापतींच्या खातेवाटपामध्ये देवराव भोंगळे यांना बांधकाम, तसेच शिक्षण खाते मिळाले आहे. ईश्वर मेश्राम यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे.शिक्षण तथा आरोग्य विभाग मिळावा, अशी उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांची इच्छा होती. तशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र त्यांना कृषी सभापतिपद देण्यात आले आहे. तर नीलकंठ कोरांगे यांना समाजकल्याणचा भार देण्यात आला आहे. सविता कुडे यांना महिला बालकल्याण खाते मिळाले आहे.समिती सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. पाच जुन्याच पदाधिकाऱ्यांची समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. दिनेश चिटणुरवार यांनी शिक्षण समितीसाठी अर्ज सादर केला. यासाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात त्यांचा नंबर कटला.माजी पदाधिकाऱ्यांपैकी संदीप गड्डमवार यांची जलव्यवस्थाप समिती सदस्य, संतोष कुमरे यांची अर्थ समिती, गुणवंतराव कारेकर शिक्षण समिती, अमृता सूर यांची बांधकाम समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)