शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षे लोटूनही पशुपालकांना मिळाले नाही अनुदान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 12:05 IST

मनरेगाचा भोंगळ कारभार : गुरांसाठी बांधले गोठे; निधी केव्हा देणार?

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गाय पालन योजनेअंतर्गत गाईचा गोठा बांधकामासाठी शासनस्तरावरून अनुदान मिळणार म्हणून पशुपालकांनी, दोन ते सहा गुरे असणाऱ्यानी दोन वर्षांपूर्वी गुरांसाठी गोठा मंजूर करून संपूर्ण बांधकाम केले; परंतु दोन वर्षांचा काल लोटून देखील गोठ्याचे पैसे मिळाले नाहीत. आता तुम्हीच सांगा साहेब, आम्हाला पैसे कधी मिळणार? अशी विचारणा लाभार्थी करीत आहेत.

दिवसेंदिवस शेती परवडत नसल्याने शासन म्हणते शेतीपूरक व्यवसाय करा. शेतीपूरक व्यवसाय केला तर त्याला शासनाकडून पैसे मिळत नसल्याचे लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे. काही युवकांनी शासनाच्या दुधाळ जनावरांच्या योजनेचा लाभ घेत दुधाळ जनावरे घेतली. त्यांना बांधण्यासाठी निवारा नसल्यामुळे पंचायत समितीअंतर्गत सुरू असलेल्या मनरेगाच्या माध्यमातून पळसगाव येथील लाभार्थी यादव धोंगडे यांनी गोठा मंदिर करून त्याची बांधणीसुद्धा केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये काही पीक नसल्यामुळे कर्जाची उचल करून त्या संपूर्ण गोठ्याचे बांधकाम केले. बांधकाम केल्याबरोबरच अनुदान मिळेल या आशेने संपूर्ण गोठ्याचे काम तत्काळ केले; पण दोन वर्षांचा काळ लोटून देखील संपूर्ण पैशाचा परतावा अद्यापही झालेला नाही. कार्यालयाच्या चकरा मारूनही अनुदानाचे पैसे मिळत नसल्याचे लाभार्थी त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत असे लाभार्थी आहेत, ज्यांनी या योजनेअंतर्गत स्वखर्चाने गोठ्याचे बांधकाम केले. मात्र, अनुदान मिळाले नाही. 'सरकारी काम अन् दोन वर्षे थांब' अशी अवस्था लाभार्थ्यांची झाली आहे. गोठ्याच्या अनुदानाचे पैसे जर मिळत नसेल तर शासनाने ही योजना राबवू नये. जेणेकरून संबंधित लाभार्थ्यांना नाहक त्रास होणार नाही. असे लाभार्थीकडून बोलले जात आहे. संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन तत्काळ लाभार्थ्यांचे अनुदान खात्यात वर्ग करावे, अशी मागणी होत आहे.

जोडधंद्याला चालना देण्यासाठी अनुदान देणे आवश्यकएकीकडे शेतीला जोडधंदा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून योजना राबवल्या जातात. त्यात युवा शेतकरी दूध व्यवसायात पाऊल टाकल्यानंतर जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा करतात. शासकीय योजनांचा आधार घेऊन गोठ्याचे बांधकाम केल्यानंतरही दोन वर्षे वाट पाहावी लागत असल्याने कुठेतरी योजनेत पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गोठा बांधून दोन वर्षे झाल्यानंतरही पैसे मिळत नसेल तर या संपूर्ण योजना बंद केल्या तरी चालेल, असेल लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे.

"गुरांचा गोठा बांधकाम करून दोन वर्षांचा काळ लोटला आहे. फक्त नऊ हजार रुपये संबंधितांकडून प्राप्त झाले आहेत; पण उर्वरित रक्कम अद्यापही दोन वर्षांपासून रखडली आहे. अनुदानाची वेळेत परतफेड होत नसल्याने पुढे एकही लाभार्थी गुरांच्या गोठ्याचा लाभ घेणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे." - ठकसेन धोंगडे, लाभार्थ्यांचा मुलगा

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर