शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

डिमांड भरून १५ वर्षांनंतरही कृषीपंपाला वीज जोडणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:54 IST

कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी म.रा.वि.वि. कंपनी भद्रावतीच्या कार्यालयात सन २००२ ला डिमांड भरली.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनी विरोधात ग्राहकांच्या अनेक तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी म.रा.वि.वि. कंपनी भद्रावतीच्या कार्यालयात सन २००२ ला डिमांड भरली. त्यानंतर अनेक वेळा त्याबाबत विचारणा केली. अधिकाºयांकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. आज १५ वर्षे झालीत तरीही कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यात आला नाही. अशी व्यथा येथील रहिवाशी नामपल्लीवार यांनी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी, मर्यादित भद्रावती उपविभागाच्या ग्राहक संवाद व सुचना मेळाव्यात मांडली.भद्रावतीत शनिवारी ग्राहक सुचना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरी तथा ग्रामीण भागाच्या अनेक तक्रारी याप्रसंगी ग्राहकांनी मांडल्या. २५ वर्षापासून जुने असलेले विजेचे तार बदलविण्यात यावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली. एलएडी बल्ब लावूनही विजेचे बिल वाढतच आहे, युनिटमध्ये प्रचंड वाढ होत आहे, लाईन कनेक्शन तोडण्याच्या धमक्या वीज कर्मचाºयांकडून दिल्या जात असून ग्राहकांना नाहक त्रास दिल्या जात आहे, ग्रामीण भागातील पिपरी (दे) येथील रहिवाशी गोपाळकृष्ण कुटेमाटे यांना १२ हजार १६० रुपयांचे वीजबिल आले. अवास्तव बिलाच्या अनेक तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या, टोल फ्री क्रमांकाचा उपयोग होत नाही, कार्यालयातील फोन कर्मचारी जाणूनबुजून उचलत नाही, याही तक्रारी करण्यात आल्या. शेतकºयांना वीज पंपाचे कनेक्शन न दिल्याने व योग्य वीज पुरवठा होत नसल्याने शेतातली उभी पिके खराब होत आहेत. गोविंद लेआऊट येथील विजेचे खांब वाकले आहे, हवा आली तरी वीज जाते, अशा अनेक तक्रारी या प्रसंगी करण्यात आल्या. यावेळी ग्राहक पंचायतचे जिल्हा कोषाध्यक्ष शेखर घुमे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर डुकरे, भास्कर ताजणे, काँग्रेसचे डॉ.विजय देवतळे, दिलीप ठेंगे, तसेच नामपल्लीवार, खुटेमाटे यांनी आपल्या तक्रार केली. मेळाव्याला मराविवि कंपनीचे अधीक्षक अभियंता हरिष गजबे, कार्यकारी अभियंता राठी, उपकार्यकारी अभियंता सचिन बदखल, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या तक्रारी घेण्यात आल्या.