बल्लारपूर येथे पोदार इंटरनॅशनल शाळेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:10+5:302021-02-05T07:42:10+5:30
बल्लारपूर : पोदार एज्युकेशन नेटवर्क ही भारतातील एक सर्वोत्तम शिक्षण संस्था असून, आता ही संस्था बल्लारपूर येथे सुरू होत ...

बल्लारपूर येथे पोदार इंटरनॅशनल शाळेची स्थापना
बल्लारपूर : पोदार एज्युकेशन नेटवर्क ही भारतातील एक सर्वोत्तम शिक्षण संस्था असून, आता ही संस्था बल्लारपूर येथे सुरू होत आहे. पोदार इंटरनॅशनल शाळा ही एक प्रस्तावित सीबीएसई शाळा शैक्षणिक वर्ग २०२१-२२ पासून नर्सरी ते सहावीपर्यंत असून, जून २०२१ मध्ये सुरू होणार आहे. पोदार शिक्षण संस्थेचे जनरल मॅनेजर मार्केटिंग विशाल शहा यांनी सांगितले की, आमचे मुख्य ध्येय संपूर्ण भारतातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुयोग्य अभ्यासक्रम, गुणवत्तापात्र निष्ठावंत शिक्षक, आदर्श पायाभूत सुविधा आणि सुरक्षित बससेवा हे सर्व उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पोदार इंटरनॅशनल शाळेमध्ये तंत्रज्ञानावर जास्त भर दिला जातो. त्यामुळे सर्व वर्ग डिजिटल प्रोजेक्टर, विज्युलायजर्सने सुसज्ज असतील. शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब, लायब्ररीबरोबरच संगीत, नृत्य, नाटक, योगा आणि स्केटिंगसाठी विशेष वर्ग असणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता पोदार इंटरनॅशनल शाळेने सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस, मेडिकल किट, अग्निशमक साधने, स्री परिचालिका तसेच वेग मर्यादा ४० किमी स्पीड गवर्नर अशा सोयींनी सुसज्ज अशा बसेसची सेवा उपलब्ध केली आहे. बल्लारपूर येथील शाळा, आमची शिक्षण पद्धती नवीन प्रदेशात विस्तार करायच्या उपक्रमाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.