राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करा

By Admin | Updated: September 2, 2015 00:48 IST2015-09-02T00:48:40+5:302015-09-02T00:48:40+5:30

पत्नीपीडित पुरूषांना मानसिक आधार देऊन तसेच कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांचा परिवार विभक्त होण्यापासून वाचविण्याचे काम ..

Establish National Men's Commission | राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करा

राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करा

चंद्रपुरात चर्चासत्र : पत्नीपीडित पुरूषांची मागणी
घोडपेठ : पत्नीपीडित पुरूषांना मानसिक आधार देऊन तसेच कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांचा परिवार विभक्त होण्यापासून वाचविण्याचे काम जिल्ह्यात भारतीय परिवार बचाव संघटना करीत आहे. मात्र त्यांना आधार देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी नंदकिशोर मैंदळकर यांनी केली.
रविवारी चंद्रपुरातील आझाद बागेमध्ये संघटनेचे सल्लागार अ‍ॅड. संदीप नागापुरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी शिक्षणाधिकारी नरेंद्र पिंपळकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, डॉ. गुरूदेव गेडाम, सुदर्शन नैताम, विनोद पिसे, दीपक पराते, प्रशांत हजबन, संदीप आत्राम, शीतल साळवे, डॉ. राहुल विधाते आदी उपस्थित होते.
सभेत अनेकांनी स्त्री अत्याचाराच्या व्यथा मांडल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर चर्चासत्रात बोलताना म्हणाले, स्त्री अत्याचाराने समाज ढवळून निघत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था ढासळू लागली आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेची मृत्युघंटा वाजत आहे. हुंडाबळी कायदा ४९८ अ चे भूत प्रत्येक पुरूषाच्या मानगुटीवर बसणार आहे. आजपर्यंत समाजाने स्त्रीला देवीच्या स्थानी बघितले आहे. तिला देवगाय म्हटले आहे व पुरूषाला मारकुंडा सांड. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. सर्व्हेनुसार जास्तीत जास्त खटले साध्याभोळ्या निर्व्यसनी पुरूषांवर झालेले आहेत, असे सांगितले.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या सर्व्हेनुसार २०१४ या वर्षात ६० हजार स्त्री अत्याचारग्रस्त पुरूषांनी आत्महत्या केल्या आहेत.
९८ टक्के स्त्रिया नवरा आपल्या मनासारखा वागत नसल्यास त्याच्यावर केस करतात. त्यांना घरात सासू-सासरे नकोत, जेलमध्ये पाठवेन अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. स्त्रियांच्या बाजूने हुंडाबळीचा कायदा आहे. त्याचा खुळखुळ्यासारखा वापर स्त्रिया करीत आहेत. तो वाजवला की सासरचे सगळे गजाआड. अशा प्रकरणांत स्त्रीच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची संख्या जास्त असते. पण पुरूष हा एकाकी असतो. त्यामुळे पुरूषाला दाद मागायला जागाच नाही.
पुरूषांनाही दाद मागता यावी पुरूष आयोगाची स्थापन करून पुरूषांनाही ४९८ ब हा कायदा बहाल करावा जेणे करून दोषी स्त्रीवरही कारवाई करता येईल, असे नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Establish National Men's Commission