ज्ञानाच्या कक्षा वाढवा- मुनगंटीवार

By Admin | Updated: August 17, 2015 00:49 IST2015-08-17T00:49:11+5:302015-08-17T00:49:11+5:30

ज्ञानामुळे जग अधिकाधिक समृद्ध होत आहे. विज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे.

Enlarge Knowledge Level- | ज्ञानाच्या कक्षा वाढवा- मुनगंटीवार

ज्ञानाच्या कक्षा वाढवा- मुनगंटीवार

बल्लारपूर : ज्ञानामुळे जग अधिकाधिक समृद्ध होत आहे. विज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. त्याचे मूळ ज्ञान आणि जिज्ञासा हे आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टींकडे लक्ष देऊन आपल्या ज्ञानात अधिक भर कशी घालता येईल, याबाबत प्रयत्नशील राहावे. प्रगतीचा टप्पा गाठून स्वत:चा, सोबतच समाज व पर्यायाने देशाचा विकास साधावा, असे मोलाचे मार्गदर्शन राज्याचे वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील जव्हेरी विद्यालयातील विद्यार्थिनीना केले. या विद्यालयात ५०० विद्यार्थिनींना गणवेश तसेच काही विद्यार्थिनींना बॅगचे वाटप झाले. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून मुनगंटीवार बोलत होते.
अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रवींद्र भागवत होते. आ. संजय धोटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष जैनुद्दीन जव्हेरी, संस्थेचे पदाधिकारी इब्राहिम जव्हेरी, इब्राहिम जैनुद्दीन जव्हेरी, पोलीस निरीक्षक नरुमणी टांडी, शिवचंद द्विवेदी, अजय दुबे, मुख्याध्यापिका संध्या बोबडे यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार यांनी शासनाचे असलेले शैक्षणिक धोरण याबाबतही सांगितले. अ‍ॅड. भागवत यांनी दोन कथा सांगून समाजाकरिता त्यागाची भावना बाळगण्याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक जैनुद्दीन जव्हेरी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भाग्यश्री आमटे, सुरेखा चंदेल, सुनिता कांबळे व मृणाल मोरे यांनी करुन दिला. संचालन सुजाता घट्टूवार यांनी केले तर आभार नंदा वंगलवार यांनी मानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Enlarge Knowledge Level-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.