राज्य महामार्गालगतच्या लेआऊटमधील रस्त्यांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:24 PM2018-05-13T23:24:04+5:302018-05-13T23:24:04+5:30

राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते प्रत्येक ले-आऊटधारकांनी केले आहे. मात्र ले-आऊट मधील १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसायिकांनी पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे.

Encroachments on the roads in state highways | राज्य महामार्गालगतच्या लेआऊटमधील रस्त्यांवर अतिक्रमण

राज्य महामार्गालगतच्या लेआऊटमधील रस्त्यांवर अतिक्रमण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा: राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते प्रत्येक ले-आऊटधारकांनी केले आहे. मात्र ले-आऊट मधील १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसायिकांनी पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते दिसेनासे झाल्याने नागरिक राज्य महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याचा उपयोग करीत असल्याने अनेक अपघात होवून अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
नागपूर- चंद्रपूर राज्य महामार्ग वरोरा शहरातील वर्दळीचे समजले जाणारे आनंदवन चौक, रत्नमाला चौक व बोर्डा चौकातून जात आहे. या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ले-आऊट आहे. या ले-आऊटमधील नागरिक थेट राज्य महामार्गावर आल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशा ले-आऊट धारकांना १२ मीटरचा अंतर्गत रस्ता सोडून रस्ता तयार करणे बंधनकारक आहे. या नियमानुसार ले-आऊटधारकांनी राज्य महामार्गलगत अंतर्गत रस्ते सोडले आहे. वरोरा शहरातील आनंदवन चौक ते बोर्डा चौकात विनायक ले-आऊट वगळता इतर ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते शोधूनही सापडत नाही. या अंतर्गत रस्त्यावर मोठ-मोठ्या व्यवसायिकांनी पक्के अतिक्रमण करुन आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे रस्ता असूनही अतिक्रमनामुळे नागरिकांना जाता येत नाही.
त्यामुळे नागरिकांना राज्य महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. आनंदवन चौक ते बोर्डा चौक या रस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात जड वाहनाची वर्दळ असल्याने नागरिक महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याची निवड करतात. त्यामुळे याही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असल्याने अनेकदा अपघात झाले आहे. त्यात काहींचा मृत्यू तर काही कायमचे अपंग झाले आहे. राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Encroachments on the roads in state highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.