खडसंगीतील मुख्य रस्त्यावर दुकानदारांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST2021-03-18T04:26:59+5:302021-03-18T04:26:59+5:30

खडसंगी: चिमूर तालुक्यातील खडसंगी हे गाव चिमूर - वरोरा रोडवर असून, येथे काही दिवसांपासून नियमित दुकानदारांनी दुकानासमोर अतिक्रमण केले ...

Encroachment of shopkeepers on the main road in Khadsangi | खडसंगीतील मुख्य रस्त्यावर दुकानदारांचे अतिक्रमण

खडसंगीतील मुख्य रस्त्यावर दुकानदारांचे अतिक्रमण

खडसंगी:

चिमूर तालुक्यातील खडसंगी हे गाव चिमूर - वरोरा रोडवर असून, येथे काही दिवसांपासून नियमित दुकानदारांनी दुकानासमोर अतिक्रमण केले आहे. यामुळे या ठिकाणी अपघातही घडत आहेत.

दररोज मुख्य मार्गावरून शेकडो वाहने जातात. परंतु येथील काही दुकानदारांनी अगदी मुख्य मार्गालगत आपली दुकाने थाटली असून, दोन वाहने आल्यानंतर त्यांना जाण्यासाठी मार्गच शिल्लक राहात नाही.

अनेकदा येथे अशाच प्रकाराने लहान मोठे अपघात झाले आहेत. अनेक दुकानदारांच्या दुकानासमोर दुचाकी, सायकल ठेवून असल्याने अपघाताने वादही झालेले आहेत.

येथील आठवडी बाजार गुरुवारी भरत असून, त्यादिवशी मार्गावरून जाण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. शाळेतील मुलेसुद्धा अनेकदा अपघाताने गंभीर जखमी झाली आहेत.

येथील दुकानदारांनी मुख्य मार्गालगत केलेले अतिक्रमण हटवून मुख्य मार्ग खुले करून द्यावे. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Encroachment of shopkeepers on the main road in Khadsangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.