वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वनप्रकल्प सक्षम

By Admin | Updated: October 5, 2014 23:02 IST2014-10-05T23:02:17+5:302014-10-05T23:02:17+5:30

व्यावसायिक उपक्रमासाठी वनविकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली. ९०० चौ. किमी वनक्षेत्र वनप्रकल्पाच्या ताब्यात आहे. आजपर्यंत हजारो हेक्टरवर उत्कृष्ठ रोपवन करुन उच्च दर्जाचे वन तयार करण्याचे

Enabling forests to protect wildlife | वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वनप्रकल्प सक्षम

वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वनप्रकल्प सक्षम

कोठारी : व्यावसायिक उपक्रमासाठी वनविकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली. ९०० चौ. किमी वनक्षेत्र वनप्रकल्पाच्या ताब्यात आहे. आजपर्यंत हजारो हेक्टरवर उत्कृष्ठ रोपवन करुन उच्च दर्जाचे वन तयार करण्याचे काम वनप्रकल्पाने केले आहे. सोबतच वनसंवर्धन व संरक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे. मानव व वन्यजीवांत संघर्ष निर्माण झाल्यास वन्यजीवांच्या संरक्षणाकडे महामंडळाची उदासीनता असल्याची टीका होते. मात्र वन संरक्षणासोबत वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी वनविकास महामंडळ सक्षम असल्याचे मत मार्कडा वनविभागाचे विभागीय व्यवस्थापक पी. आर. धावडा यांनी व्यक्त केले. वन्यजीव सप्ताहानिमित्त कन्हारगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
१ ते ७ आॅक्टोबरला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी मध्ये चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह यांच्या विद्यमाने कन्हारगाव येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव सप्ताहा साजरा करण्याची गरज काय, याबाबत जनतेला जागृत करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या,शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहिती देण्यात आली.
विभागीय व्यवस्थापक एम. एस. फारुखी, पश्चिम वनप्रकल्प चंद्रपूरचे विभागीय व्यवस्थापक एस. एस.सावकर, मानद वन्य जीव संरक्षक उदय पटेल, मुकेश भांदककर, सहायक व्यवस्थापक एम. डी. सातपुते, सुरेश रंगारी व राजू जुनघरे यांची उपस्थिती होती. मान्यवरांची वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी संवर्धनासाठी मानवाने काय करायला हवे याबाबत विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी वन्य प्राण्यांमध्ये वाघाचे महत्व विषद करण्यात आले. तृणभक्षी, मासभक्षी प्राणी, जंगलातून प्राप्त होणारे विविध पाने , फुले व फळे यांचे मानव जीवास किती महत्व आहे याचे उदाहरण देवून वन्यजीवांचे अधिवासास धोका निर्माण होवू नये याकरिता सतत जागरुक राहावे, असे मत उदय पटेल यांनी व्यक्त केले. संचालन वनपाल चिंतलवार, प्रास्ताविक व आभार वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Enabling forests to protect wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.