मनरेगाच्या 1197 कामांवर 7 हजार 291 मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:34+5:30
जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यावरच मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. रब्बी हंगामातून मजुरांना पुरेसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मजूर कोरोनापूर्वी विविध शहरात रोजगासाठी गेले होते. लॉकडाऊन उठविल्यानंतर हे मजूर आपापल्या गावात परत आले. त्यामुळे रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरू होणार की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

मनरेगाच्या 1197 कामांवर 7 हजार 291 मजुरांना रोजगार
n लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाने ग्रामीण भागातील नागरिकांना संकटात ढकलल्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्यात मोठा आधार ठरला आहे. सध्या एक हजार १९७ कामे सुरू असून त्यावर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार मिळाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यावरच मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. रब्बी हंगामातून मजुरांना पुरेसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मजूर कोरोनापूर्वी विविध शहरात रोजगासाठी गेले होते. लॉकडाऊन उठविल्यानंतर हे मजूर आपापल्या गावात परत आले. त्यामुळे रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरू होणार की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चार हजार मजुरांना रोजगार मिळाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी सूचना दिल्याने तातडीने मनरेगाची कामे मंजूर करण्यात आली. जिल्ह्यात ८१० ग्रामपंचायतींतर्गत एक हजार १९७ कामे सुरू आहेत. या कामावर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. मनरेगा कामासाठी शासनाकडून पात्र व्यक्तिंना जाॅबकार्ड देण्यात आले. कार्डधारकांनी कामाची मागणी केल्यास ग्रामपंचायतीमध्ये चर्चा होते. अधिकाऱ्यांना अहवाल पाठविल्यानंतर कामाला मंजुरी दिली जाते. यंदा संकटात मनरेगाने मोठी मदत केली आहे.
तीन तालुक्यात सर्वाधिक कामे सुरू
ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यात केली जात आहेत. नागभीड तालुक्यात १ हजार ९३४, सिंदेवाही ७५६ व ब्रह्मपुरी तालुक्यात १ हजार १३ मजुरांना रोजगार मिळाला आहे. बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर व राजुरा तालुक्यात तुलनेने कमी कामे मंजूर झाली आहेत. मनरेगाच्या ११९७ कामांवर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार झाली आहेत. चिमूर, सावली या तालुक्यात कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला.
ग्रामीण भागात शेतीपासूनच रोजगार मिळतो. मात्र, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे वाढविणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मजुरांचे हाल झाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मनरेगामुळे आधार मिळू शकतो.
- नानाजी बिरादार, रा. येरमी येसापूर ता. जिवती